Coronavirus : T-Series चे अध्यक्ष भूषण कुमार यांच्याकडून PM केअर फंडामध्ये 11 कोटीचा निधी दान

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –  कोरोना विषाणूची आतापर्यंत देशात 1000 हून अधिक जणांना लागण झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. दरम्यान, कोरोना व्हायरसच्या लढाईत देशातील अनेकांनी कोट्यावधी रुपयांचा निधी पंतप्रधान केअर फंडामध्ये जमा केला आहे. यामध्ये रतन टाटा, अक्षय कुमार तसेच देवस्थान आणि सामाजिक संस्थांनी मदत दिली आहे. आता संगीत क्षेत्रातील नामांकित कंपनी टी-सीरीजने देखील मदत जाहीर केली आहे. टी-सीरीजचे अध्यक्ष भूषण कुमार यांनी 11 कोटी रुपयाचा निधी पीएम केअर फंडामध्ये दान केला आहे.

टी-सीरीजचे अध्यक्ष भूषण कुमार यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. भूषण कुमार यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, आज आपण सर्वजण कठीण काळातून जात आहोत. अशा परिस्थितीत प्रत्येकाने मदत करणे खूप महत्त्वाचे आहे. आयएम आणि टी सीरीज कुटुंबे पीएम केअर फंडात 11 कोटींची मदत निधी देत आहोत. एकत्रितपणे आपण ही लढाई लढवू शकतो, जय हिंद.

दुसऱ्या एका ट्विटमध्ये टी सीरजने मुख्यमंत्री मदत निधीत एक कोटी रुपये दिले आहेत. भूषण कुमार यांनी दुसऱ्या ट्विटमध्ये म्हटले आहे, गरजेच्या या वेळी टी सीरीज मुख्यमंत्री मदत निधीसाठी एक कोटीची देणगी देत आहे. अशा आहे की आपण लवकरच या कठीण परिस्थितीतून मुक्त होऊ, घरी रहा, सुरक्षित रहा.
अक्षय कुमारकडून 25 कोटीची घोषणा

अभिनेता अक्षय कुमार याने यापूर्वीच 25 कोटी रुपये देण्याची घोषणा केली आहे. त्याच्यानंतर वरूण धवनने देखील मदत जाहीर केली आहे. वरुण धवनने 55 लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे. या रकमेमध्ये त्यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री मदत निधीला 25 लाख आणि पीएम केअर फंडला 30 लाख रुपये दिले आहेत.