पोलिसनामा ऑनलाईन टीम – कोरोनामुळे बहुतांश नोकरी, व्यवसाय करणारे गावी परतत आहे. मात्र, गावी गेल्यानंतर संबंधितांना 14 दिवसांसाठी क्वारंटाईन करण्यात येत आहे. क्वारंटाईनच्या भीतीमुळे अनेकजण पळून जात असल्याच्या घटना घडल्या आहेत. अशीच एक घटना अकोला जिल्हा येथून आपल्या गावी मढी बुद्रुक येथे घडली आहे. संंबंधित तरुणाला परगावाहून आल्यामुळे क्वारंटाईन कक्षात हजर होण्यास सांगितले असता त्याचा राग आल्यामुळे त्याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. या प्रकरणी गावचे सरपंचांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अजय भाऊसाहेब मोकळ असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. अजय अकोला जिल्हा येथून मढी बुद्रुक येथे आला होता. मात्रा, त्याबाबत त्यांनी कोणालाही माहिती दिली नाही. त्यांना विलगीकरण कक्षात हजर होण्यास सांगितले असता, त्यांनी नकार दिला. नंतर विषारी औषध सेवन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे गावकर्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.