Tuberculosis | जगात वाढले टीबीचे रूग्ण, 36 टक्के मृत्यू एकट्या भारतात; जाणून घ्या लक्षणे आणि बचावाची पद्धत

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Tuberculosis | जागतिक आरोग्य संघटनेच्या World Health Organization (WHO) 2022 च्या ग्लोबल टीबी अहवालानुसार, 2021 मध्ये जगभरात सुमारे 10.6 दशलक्ष लोकांना टीबी रोगाचे (TB Disease) निदान झाले. ज्यामध्ये 2020 पासून 4.5% ची वाढ नोंदवली गेली आहे, तर 1.6 दशलक्ष रुग्णांचा बॅक्टेरियल डिसीजमुळे मृत्यू झाला आहे (Tuberculosis). गुरुवारी, 28 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध झालेल्या अहवालात असे म्हटले आहे की, 28% प्रकरणांसह भारत, क्षयरोगाच्या एकूण रुग्णांच्या दोन तृतीयांश किंवा 68.3% पेक्षा जास्त असलेल्या आठ देशांमध्ये आहे. इतर देशांमध्ये इंडोनेशिया (9.2%), चीन (7.4%), फिलीपिन्स (7%), पाकिस्तान (5.8%), नायजेरिया (4.4%), बांगलादेश (3.6%) आणि काँगो लोकशाही प्रजासत्ताक (2.9%) यांचा समावेश आहे. (Tuberculosis Symptoms And Methods Of Prevention)

 

एकूण टीबी मृत्यूंपैकी, 187,000 रुग्ण एचआयव्ही (ह्युमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस) पॉझिटिव्ह देखील होते. अहवालात म्हटले आहे की एचआयव्ही-निगेटिव्ह लोकांमधील जागतिक क्षयरोगाच्या मृत्यूंपैकी सुमारे 82% मृत्यू आफ्रिकन आणि दक्षिण-पूर्व आशिया प्रदेशात झाले आहेत, ज्यापैकी 36% मृत्यू एकट्या भारतात आहेत.

 

डब्ल्यूएचओचे महासंचालक टेड्रोस अ‍ॅडनोम गेब्रेयसस म्हणाले, कोविड-19 महामारीने आम्हाला काही शिकवले असेल, तर ते म्हणजे एकता, दृढनिश्चय, नावीन्यपूर्ण आणि साधनांचा समन्यायी वापर करून, आपण गंभीर आरोग्य धोक्यांवर मात करू शकतो. हा धडा टीबीवर लागू करूया. हा दीर्घकाळ जीवघेणा आजार थांबवण्याची वेळ आली आहे. एकत्र काम करून आपण क्षयरोगाचा नाश करू शकतो. (Tuberculosis)

क्षयरोगाची लक्षणे
1. तीन आठवड्यांहून जास्त काळ खोकला
2. डांग्या खोकला
3. खोकताना रक्त येणे
4. खोकताना छातीत दुखणे
5. श्वास घेण्यास त्रास होणे
6. अशक्तपणा
7. भूक आणि वजन कमी होणे
8. रात्री झोपताना घाम येणे
9 सर्दी, सौम्य ताप

 

टीबी कशामुळे होतो?
क्षयरोग (टीबी) हा मायकोबॅक्टेरियम ट्यूबरक्युलोसिस या जीवाणूंच्या संसर्गामुळे होतो. टीबीचा रुग्ण खोकतो किंवा शिंकतो तेव्हा टीबीचे जीवाणू हवेतून दुसर्‍याच्या शरीरात पसरतात.

 

क्षयरोगाचे निदान कसे करावे?
डॉक्टर रुग्णाची लक्षणे आणि शारीरिक तपासणी करून आणि स्टेथोस्कोपद्वारे त्याचे निदान करू शकतात. याशिवाय क्षयरोग शोधण्यासाठी रक्त तपासणी, थुंकी तपासणी, छातीचा एक्स-रे आदी चाचण्या करता येतात.

 

क्षयरोग आणि उपचार
टीबीच्या उपचारासाठी, टीबीचे जीवाणू कमी करण्यासाठी विविध प्रतिजैविके दिली जातात. ही औषधे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार काही दिवस व्यवस्थित आणि नियमितपणे घेणे आवश्यक आहे. क्षयरोग झालेल्या रुग्णांना सुमारे सहा ते नऊ महिने औषधे घ्यावी लागतात. मुख्य गोष्ट अशी आहे की रुग्णाने औषध उपचारांचा कोर्स पूर्ण केला पाहिजे. शासकीय रुग्णालयात क्षयरोगावर मोफत उपचार केले जातात.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Tuberculosis | tuberculosis cases have increased after many years know the symptoms and methods of prevention

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Tiger Shroff | अ‍ॅक्शन सीन शूट करताना टायगर श्रॉफच्या पायाला दुखापत (VIDEO)

T20 World Cup 2022 | टीम इंडियाला मोठा झटका! ‘हा’ प्रमुख खेळाडू बांग्लादेश विरुद्ध नाही खेळणार

Devendra Fadnavis | शिंदे गटातील आमदार आणि खासदारांना ‘वाय प्लस’ दर्जाची सुरक्षा, – गृहमंत्र्यांनी दिले आदेश