TB चं ‘इंफेक्शन’ काही लोकांमध्ये आयुष्यभर नसतं : रिसर्च

पोलिसनामा ऑनलाइन – Immunologic Tuberculosis म्हणजेच टीबीशी संबंधित नुकत्याच झालेल्या एका रिसर्चमधून अशी माहिती समोर आली आहे की, अनेक केसेसमध्ये टीबीशी संबंधित स्किन आणि ब्लड टेस्ट पॉझिटीव्ह आल्यानंतरही प्रभावित व्यक्तीला टीबी हा आजार होत नाही. याचं कारण म्हणजे त्या व्यक्तीचं स्ट्राँग इम्युन सिस्टीम असतं असं संशोधक सांगतात.

रिसर्चमधील संशोधक सांगतात की, “इम्युन सिस्टीम स्ट्राँग असल्यामुळं म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती मजबूतअसल्या कारणानं ब्लड आणि स्किन टेस्ट टीबी पॉझिटीव्ह आल्यानंतरही काही लोकांना टीबी होत नाही. कारण त्यांच्या शरीरात हा आजार विकसितच होऊ शकत नाही. ऑर्गेनिजमच्या कारणामुळं असं इंफेक्श होतं. याद्वारे मायक्रोबॅक्टेरियम टर्ब्युक्लॉसिसला इम्युन सिस्टीम द्वारे नैसर्गिक पद्धतीनं नष्ट करून शरीराच्या बाहेर टाकलं जातं. अशात हा आजार वाढत नाही.

आतापर्यंत रिसर्चमधून हीच बाब समोर आली आहे की, टीबीचं इंफेक्शन हे आयुष्यभर राहत नाही. युनिव्हर्सिटी ऑफ पेंसिल्वेनियाशी संबंधित आणि या रिसर्चचे सहलेखक पॉल एच ए़डेलिस्टिन यांनी दिली आहे. द नॅशनल इंस्टिट्युट ऑफ हेल्थ अँड अदर नॉनप्रॉफिट ऑर्गनायझेशन अशाच प्रकारच्या रिसर्चवर मिलियन डॉलर खर्च करतात. या रिसर्चचे सहलेखक पॉल एच एडेलिस्टीन म्हणाले की, “आमच्या रिसर्चमधून ही बाब समोर आली आहे की, टीबीचं इंफेक्शन हे रेअर कंडीशनमध्येच आयुष्यभर राहतं. साधारण 90 टक्के लोकांमध्ये हा आजार परतण्याचा आणि पुन्हा धोकादायक स्तरापर्यंत पोहोचण्याचा धोका अजिबात नसतो.”

ज्या लोकांना प्रिव्हेंटीव्ह ट्रीटमेंट दिली गेली होती त्यातील त्याच लोकांमध्ये याचं इंफेक्शन सर्व्हाईव करू शकलं ज्यांना एचआयव्हीची समस्या होती किंवा ज्यांनी ऑर्गन ट्रान्सप्लांट केलं होतं. हा रिसर्च करताना संशोधकांनी याआधीच्याही अशाच काही रिसर्चचाही वापर केला होता. यानंतर यातून अनेक निष्कर्ष समोर आले आहेत.

या रिसर्चमधून अशीही बाब समोर आली आहे की, टीबीनं ग्रस्त लोकांवर एका वर्षांपर्यंत उपचार केल्यानंतरही टीबीच्या अॅक्टीव्ह केसेस 60 ते 70 टक्क्यांपर्यंत कमी झाल्या होत्या. परंतु पुढील 9 वर्षे मात्र या लोकांच्या ब्लड आणि स्किन टेस्ट टीबी पॉझिटीव्ह आल्या. यावरून हे लक्षात आलं की, टीबीचं इंफेक्शन पूर्णपणे नष्ट होण्याला 9 वर्षांचा कालावधी लागू शकतो असंही संशोधक सांगत आहेत.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही.