पाठकबाईंचा BOLD अवतार ! अक्षया देवधरचा ‘हॉट’ आणि ‘ग्लॅमरस’ लूक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – झी मराठीवरील प्रेक्षकांची सगळ्यात आवडती मालिका म्हणजे ‘तुझ्यात जीव रंगला’. या मालिकेतील पाठकबाईची भूमिका साकारणारी अभिनेत्री अक्षया देवधर हीने चाहत्यांच्या मनात घर केले आहे. या मालिकेमध्ये भोळी आणि सोज्वळ रुपाने प्रेक्षकांच्या नजरेत असणारी अक्षयाने फार कमी काळात प्रेक्षकांची मने जिंकली. अभिनेत्री अक्षया सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह असते. ती आपले फोटो त्याचबरोबर व्हिडिओ आपल्या चाहत्यांसाठी शेअर करत असते. त्याचबरोबर चाहत्यांशी संवादही साधत असते. नुकताच अक्षयाचा एक सुंदर आणि सेक्सी फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अक्षयाने तिचा एक फोटो आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. फोटोमध्ये अक्षया खूपच सुंदर आणि ग्लॅमरस तितकीच मॉडर्न दिसत आहे. अक्षया खूपच आकर्षित दिसत आहे. तिच्या या फोटोंना चाहत्यांनी खूप लाइक आणि कमेंट केल्या आहेत. अक्षया नेहमीच आपले सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

सुंदर फोटो शेअर करण्याची अक्षयाची ही पहिली वेळ नाही. याआधी देखील तिने बरेच सुंदर आणि ग्लॅमरस लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे. अक्षया काही दिवसांपुर्वीच आपल्या बिझी शेड्यूलमधून वेळ काढून गोव्याला फिरायला गेली होती. तिने शेअर केलेले फोटो गोव्यामधील आहे. ब्लॅक कलरच्या ड्रेसमध्ये अक्षया खूपच सुंदर दिसत आहे. फोटोत आणि मालिकेमधील अक्षयाच्या लूकमध्ये बराच फरक दिसत आहे.

 

Visit : Policenama.com