‘तुझ्यात जीव रंगला’ मधील ‘राणा’दाचे ‘आबासाहेब’, त्यांच्या पत्नीकडून PNG ज्वेलर्सची फसवणूक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – लोकप्रिय मालिका तुझ्यात जीव रंगला मधील कलाकार मिलिंद दास्ताने आणि त्यांच्या पत्नीने औंध येथील पीएनजी ज्वेलर्सकडून २५ लाख रुपये किंमतीचे सोन्याचे आणि हिऱ्यांचे दागिने खरेदी करून पैसे न देता फसवणूक केली. याप्रकरणी पती-पत्नीविरोदात चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यासंदर्भात अक्षय श्रीकृष्ण गाडगीळ (३४) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अभिनेता मिलिंद गणेश दास्ताने आणि त्यांच्या पत्नी सायली मिलिंद दास्ताने उर्फ सायली बालाजी पिसे (रा. तळजाई पठार, त्रिमुर्ती हाऊसिंग सोसायटी, धनकवडी) यांच्याविरोधात चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण ?

तक्रारदार हे औंध येथील पीएनजी ज्वेलर्समध्ये भागीदार आहे. मिलिंद दास्ताने आणि त्यांच्या पत्नी गाडगीळ यांच्याकडे आले. आम्हाला मोठ्या प्रमाणावर सोने, चांदी आणि हिऱ्यांचे दागिने खरेदी करायचे असल्याचे अमिष त्यांनी दाखवले. मात्र आमची मुंबईतील एक प्रॉपर्टी विल्यानंतर ३ कोटी रुपये मिळाणार आहेत. ते मिळाल्यानंतर हे पैसे देऊ असे त्यांनी सांगितले.

तसेच त्यांन यावर लागणार असलेले व्याजही देऊ असे वचन दिले. आणि जवळपास २५ लाख ६९ हजार रुपये किंमतीचे १ किलो सोन्याचे दागिने त्यांनी खरेदी केले. गाडगीळ यांच्या ज्वेलर्स मध्ये काम करणारा मॅनेजर निलेश दास्ताने हा मिलिंद दास्ताने यांचा पुतण्या आहे. त्याने वेळेत पैसे घेऊन येण्याचे आश्वासन दिले.

त्यानंतर दाम्पत्य पुन्हा दागिने खरेदीसाठी दुकानात आले. त्यांनी ४ लाख ९२ हजार रुपये किंमतीचे दागिने खरेदी केले. त्यासाठी त्यांनी २ लाख ४४ हजार रुपयांचे २ चेक दिले. ते निलेश दास्ताने याने बँकेत जमा केले. मात्र ते वटले नाहीत.

आरोग्य विषयक वृत्त – 

महिलांनो, नॅचरल ग्लो हवाय? मग अवश्य करा ‘हे’ उपाय

गरोदर महिलांनी खावेत बदाम, बाळाच्या मेंदूची होते योग्य वाढ

सौंदर्य वृद्धीसाठी प्राचीन काळापासून केले जाता ‘हे’ आयुर्वेदिक उपाय

शाकाहारी पुरुष पार्टनरला करतात पूर्ण संतुष्ट

You might also like