‘तुझ्यात जीव रंगला’ फेम माधुरी पवारच्या डान्सने चाहते घायाळ !

मुंबई, ता. २: पोलीसनामा ऑनलाइन : ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतील ‘वहिनीसाहेब’ ही भूमिकाही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. अभिनेत्री धनश्री काडगावकरनंतर नृत्यांगंना माधुरी पवारनेही वहिनीसाहेबांची भूमिका उत्तमरीत्या साकारली होती. माधुरीने (madhuri pawar ) या मालिकेत एन्ट्री केल्यानंतर तिच्या नावाची मोठी चर्चा झाली होती. कारण, माधुरी जवळपास धनश्री काडगांवकरसारखीचं दिसते. माधुरी (madhuri pawar ) अभिनेत्रीसोबतचं उत्तम नृत्यांगनाही आहे. तिचे डान्स व्हिडीओज सोशल मीडियावर चर्चेत असतात. नुकताच तिने एक डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

https://www.instagram.com/p/CPR3BDopVDh/?utm_source=ig_web_copy_link

‘सोडा सोडा राया हा नाद खुळा…’ या गाण्यावर माधुरीने धमाल डान्स केला आहे. स्लिव्हलेस ब्लाऊज आणि जांभळ्या रंगाची साडी आणि साजेसा मेकअप करून माधुरीने आपल्या अदांनी चाहत्यांना घायाळ केलं आहे. माधुरीच्या अदा पाहून तुम्हीही थक्क व्हाल. तिने छोट्या पडद्यावरील ‘अप्सरा आली’ या डान्स शोमध्ये नृत्याचे जलवे दाखवत विजेती ठरली होती. मध्यंतरी, तिचा टीप टीप बरसा गाण्यावरील एक व्हिडिओ चर्चेचा विषय ठरला होता. या व्हिडिओमध्ये तिच्या मनमोहक अदा पाहायला मिळाल्या होत्या. व्हिडिओमधील माधुरीच्या बोल्ड डान्समुळे प्रेक्षकांना भुरळ घातली होती आणि ती आजही कायम आहे. तिचे डान्सचे अनेक व्हिडिओज तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पाहायला मिळतात. ती एक उत्तम लावणीसम्राज्ञीही आहे.

https://www.instagram.com/p/CPi3CmzJDVg/?utm_source=ig_web_copy_link

माधुरीचा जन्म २१ मार्च १९९३ रोजी सातार्‍यात झाला. तिचे महाविद्यालयीन शिक्षण पुणे येथे झाले आहे. तिने एमबीएही पूर्ण केले आहे. माधुरी पवार अल्पावधीतचं लोकप्रिय झाली. याआधी धनश्री काडगावकरने वहिनी साहेबांची भूमिका साकारली होती. ती दीर्घ सुट्टीवर गेल्याने माधुरी पवारची वर्णी लागली. ही मालिका ऑफ एअर गेल्यानंतरही या मालिकेतील कलाकारांची जादू प्रेक्षकांच्या मनावर कायम आहे. आता माधुरी पवारचा एक डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तिचा डान्सिंग व्हिडिओ पाहून चाहते घायाळ झाले आहेत.

https://www.instagram.com/p/CPcdT8HpVYt/?utm_source=ig_web_copy_link

Also Read This : 

 

Paytm : तुम्हाला देखील कॅशबॅक ऑफरचा मेसेज आलाय तर व्हा सावध अन्यथा…

 

गर्भ राहण्यासाठी करा ‘हे’ ३ घरगुती उपाय

 

दिलासादायक ! भारतातील कोरोना संक्रमणाचा वेग घसरतोय, जाणून घ्या गेल्या 24 तासातील आकडेवारी

 

पोटाचा अल्सर असल्यास आढळतात ‘ही’ १० लक्षणे

 

SBI ग्राहकांसाठी मोठी बातमी ! बॅंकेने कामकाजाच्या वेळेत केला बदल, जाणून घ्या

 

यामुळेही वाढू शकतो ‘टाइप-२ डायबिटीस’चा धोका