‘तुझ्यात जीव रंगला’ मालिका धक्‍कादायक वळणावर ; ‘चालतय की’ म्हणणारा राणा’दा’ ची ‘एक्झिट’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मराठी मालिकेतील सर्वात बहुचर्चेत असलेली आणि त्याचबरोबर सगळ्यांची आवडती मालिका ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेने भलतेच वळण घेतले आहे. या मालिकेची एक गोष्ट कळताच सर्वांना आश्चर्याचा धक्का बसणार आहे. मराठी प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी ही मालिकेत आता पहिलवान गडी दिसणार नाही. या मालिकेत राणाचा मृत्यू होणार आहे. या मालिकेला एक वेगळेच वळण येणार आहे.

लहानपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांना वेड लावणारा राणा आणि त्याचबरोबर पाठकबाई या जोडीमध्ये प्रेक्षकांचा जो जीव गुंतला आहे. आता त्यांच्या जोडीला अनोखे वळण येणार आहे. या मालिकेतील फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. या फोटोवरुन असे समजते की, राणा मृत्यू होणार आहे. राणाचा मृत्यू हा चाहत्यांसाठी धक्कादायक असणार आहे. आता राणा पुन्हा सेटवर किंवा मालिकेत दिसणार नाही याचे दुःख सगळ्यांनाच होणार यात काही शंका नाही. पण राणा आता या मालिकेत पुन्हा झळकणार नाही हे स्पष्ट झाले आहे.

राणा मालिकेतून बाहेर का पडणार याचे कारण अद्यापही कोणाला कळाले नाही पण त्याच्या जागी कोणता कलाकार येणार याचा प्रश्न सगळ्यांनाच पडणार आहे. ‘तुझ्यात जीव रंगला’ ही मालिका राणा आणि अंजली या दोघांवर आधारित आहे. जर त्यामधील एक जरी मालिकेत नसेल तर मालिकेत काहीच रस राहणार नाही. राणादा ची भूमिका साकारणारा हार्दिक याने मालिका सोडल्याचे कारण सांगितले नाही. त्याच्या जाण्याने मालिकेवर मोठा परिणाम होणार असे वाटते.

‘तुझ्यात जीव रंगला’ ही मालिका ३ ऑक्टोबर २०१६ रोजी सुरु झाली होती. या मालिकेत मुख्य भूमिकेत हार्दिक जोशी ( राणा दा), अक्षया देवधर (पाठकबाई), छाया सानगावकर (गोदाक्का), राज हानचांगले (सनी दा), अमोल नाईक (बरकत), दिप्ती सोनवणे (चंदा) हे मुख्य कलाकार भूमिकेत आहेत.

सिनेजगत

#Video : ‘हे’ बॉलिवूडचे सुपरस्टार मिडिया समोर लपवितात ‘चेहरा’

‘बेबी डॉल’ सनी लिओनी सुरू करणार ‘हा’ नवा ‘उद्योग’ !

शाहरूख खानची मुलगी सुहाना आता ‘या’ फिल्म मध्ये काम करणार

‘त्याच्या’शी ब्रेकअप झाल्यानंतर ‘या’ गोष्टीमुळे सावरले : कतरिना कैफ

 

Loading...
You might also like