Tukaram Gadakh Passes Away | माजी खासदार तुकाराम गडाख यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सन २००४ ते २००९ च्या दरम्यान अहमदनगर (दक्षिण) लोकसभा मतदारसंघाचे खासदार राहिलेले तुकाराम गडाख (Tukaram Gadakh Passes Away) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ७२ वर्षांचे होते. त्यांनी नेवासा विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणूनही काम केले. तुकाराम गडाख (Tukaram Gadakh Passes Away) यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी, बंधू किसन गडाख, पाच बहिणी, एक मुलगा, दोन मुली, नातवंडे असा परिवार आहे.

 

गुरुवारी मध्यरात्री तुकाराम गडाख यांना हृदयविकाराचा झटका आला.
त्यानंतर त्यांना अहमदनगर येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
मात्र, त्यांची प्राणज्योत मावळली. नेवासा तालुक्यातील पानसवाडी येथील मूळ रहिवाशी असलेले तुकाराम यांचा जन्म १ नोव्हेंबर १९५३ साली झाला होता.
१९८९ ते १९९४ मध्ये त्यांनी शेवगाव-नेवासा विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष नेते म्हणून प्रतिनिधित्व केले,
तर २००४ ते २००९ मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते

.

Web Title :- Tukaram Gadakh Passes Away | former mp tukaram gadakh passes away

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | मुलाच्या त्रासामुळे 17 वर्षाच्या युवतीची गळफास घेऊन आत्महत्या, चंदननगरमधील घटना

Kirit Somaiya-Sai Resort | साई रिसॉर्टप्रकरणी किरीट सोमय्यांनी चुकीची माहिती दिली; अधिकाऱ्यांचा खुलासा

Chennai Super Kings (CSK) | धोनीनंतर चेन्नई सुपर किंग्सचा उत्तराधिकारी कोण? सीएसकेच्या प्रशिक्षकांनी केला ‘हा’ मोठा खुलासा

Pune ACB Trap | खुन आणि मोक्काच्या केसमधून सुटण्यासाठी 2 लाख नाही तर 10 लाखांची होती मागणी, अ‍ॅन्टी करप्शनच्या तपासात माहिती उघड

Indrani Balan Winter T20 League 2022 | दुसरी ‘इंद्राणी बालन विंटर टी-२० लीग’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धा; एमईएस क्रिकेट क्लबचा सलग चौथा विजय; व्हिजन क्रिकेट अ‍ॅकॅडमीचा सलग दुसरा विजय !!