पुण्यनगरीत तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्या दाखल 

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन

विठ्ठल नामाच्या जयघोष करीत संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज या दोन्ही पालख्यांचे पुणे शहरात संचेती हॉस्पिटल च्या बाजूच्या पुलावरून सायंकाळच्या सुमारास आगमन झाले.

पुणे शहरात संगमवाडी पुलाजवळ संत तुकाराम महाराजाची पालखी साडे पाच वाजता आणि संत ज्ञानेश्वर महाराजाची पालखी सात वाजता पालखीचे आगमन झाले. या दोन्ही पालख्याचे पुणेकरांनी मोठ्या जल्लोषात स्वागत केले. तर यामध्ये प्रामुख्याने दरवर्षी प्रमाणे यंदा देखील तरुणाई पालखी सोहळ्यात मोठ्या संख्येने सहभागी झाली होती. त्यात विशेषतः आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींनी देखील वारीचा आंनद लुटला. वारीमध्ये सहभागी झालेल्या भाविकांना दैनंदिन वापरासाठी लागणाया वस्तूचे देखील अनेक नागरिकांनी वाटप केल्याचे पाहावयास मिळाले.
[amazon_link asins=’B07B6SN496′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’b94101eb-8206-11e8-9036-57cbb0f6f30c’]

पुणे शहरात आगमन होणाऱ्या पालख्यांचे महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून स्वागत करण्यात आले. त्यानंतर दरवर्षीप्रमाणे संत तुकाराम महाराजांची पालखी भवानी पेठेतील निवडुंगा विठोबा मंदिरात तर ज्ञानेश्वर महाराजांची पालखी भवानी पेठेतील विठोबा मंदिराच्या मुक्कामी ठिकाणी मार्गस्थ झाल्या.