Tukaram Supe | ‘मन:स्ताप होतोय, आत्महत्या करावीशी वाटते’ – तुकाराम सुपे

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Tukaram Supe | टीईटी परीक्षा घोटाळा (TET Exam Scam) प्रकरणात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचा आयुक्त तुकाराम सुपे (State Education Council Commissioner Tukaram Supe) याला अटक (Arrest) करून निलंबित (Suspend) केले आहे. त्यानंतर त्याच्या घर आणि कर्यालयात करण्यात आलेल्या छापेमारीत कोट्यावधी रुपयांचे घबाड पोलिसांच्या हाती लागले. हा घोटाळा उघड झाल्यापासून तुकाराम सुपे (Tukaram Supe) तणावात असल्याची माहिती त्याचे वकील मिलिंद पवार (Adv. Milind Pawar) यांनी दिली आहे. तर सुपे याने मला आत्महत्या करावीशी (Commit Suicide) वाटते, असा इशारा दिला आहे.

 

मिलिंद पवार यांनी सांगितले, टीईटी परीक्षा घोटाळ्याप्रकरणी मला बळीचा बकरा बनवला जात आहे. मला जाणूनबुजून टार्गेट केले जात आहे. या सगळ्याचा मन:स्ताप होत असल्याचे सुपे म्हणाला असल्याचे पवार यांनी सांगितले. सुपेच्या कुटुंबातील लोकांनाही आरोपी करणार असल्याची पुणे पोलिसांची (Pune Police) तयारी आहे. 2017 मध्ये ज्या कंपन्या होत्या, त्यांनाच कामे दिली होती. परंतु या सगळ्यात मला बळीचा बकरा बनवलं जात असल्याचे सुपे (Tukaram Supe) याने म्हटल्याचे पवार यांनी सांगितले.

मुलगी आणि जावयाकडे आढळली रक्कम
राज्य परीक्षेचा आयुक्त तुकाराम सुपे (Tukaram Supe) याने मुलगी (Daughter) आणि जावयाकडे (Son-in-law) दिलेल्या बॅगा जप्त केल्या असून त्यात तब्बल एक कोटी 59 लाख रुपयांची रोकड तसेच 44 वेगवेगळ्या प्रकारचे दागिने असा एकूण 2 कोटी पेक्षा अधिकचा ऐवज जप्त केला होता.

 

दुसऱ्या धाडीत 2 कोटींची रोकड जप्त
घरी दुसऱ्यांदा धाड टाकली त्यावेळी 2 कोटी रुपयांची रोकड, दागिने सापडले.
तुकाराम सुपे याला पोलिसांनी अटक केल्याचे समजताच त्याच्या पत्नीने हा ऐवज मेव्हण्याकडे दिला होता.
पोलीस तपासात ही माहिती समोर आल्यानंतर पोलिसांनी 1 कोटी 98 लाख रुपयांची रोकड व दागिने जप्त केले आहेत.
यापूर्वी सुपेच्या घरातून 88 लाख रुपयांची रोकड दागिने 5.5 लाखांच्या ठेवी असा एकूण 96 लाख रुपयांचा ऐवज जप्त केला होता.

 

Web Title :- Tukaram Supe | i am upset everyone i want commit suicide tukaram supe

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Driving License | ‘ड्रायव्हिंग लायसन्स’साठी टेस्टचे झंझट संपले ! ‘या’ एका सर्टिफिकेटवर बनू शकते ‘DL’, जाणून घ्या नवीन नियम

PM SVANidhi scheme | केंद्र सरकार ‘या’ लोकांना देतंय पूर्ण 10,000 रुपये, थेट खात्यात येतील पैसे; मार्चपुर्वीच तात्काळ करा ‘हे’ काम !

 

Coronavirus in Maharashtra | राज्यात ‘कोरोना’ रुग्णांमध्ये मोठी वाढ, गेल्या 24 तासात 1648 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी