दारू अड्डा महिलांनी केला उध्वस्त

कराड : पोलीसनामा ऑनलाईन – कराड तालुक्यातील म्हासोली येथे महिलांनी आक्रमक होत दारू अड्डे उध्वस्त केल्याची घटना ताजी असतानाच असाच प्रकार या विभागातील तुळसण या गावात घडला आहे. या गावातील महिलांनी एकत्र येवून दारू अड्डा उध्वस्त केला आहे. याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

गावातील युवा पिढी तसेच आबाल-वृद्ध व्यसनांच्या आहारी जात असल्याने तुळसणमधील महिला संतप्त झाल्या आहेत. तसेच अवैध  दारू विक्रेत्यांची गेल्या काही दिवसांपासून मनमानी सुरू होती.  त्यामुळेच महिलांनी आक्रमक होत गावातील दारू अड्ड्यांवर छापा टाकला आहे. त्या ठिकाणीच्या दारू विक्रेत्यांच्या घराची झडती घेतली आहे. त्यानंतर सापडलेल्या दारू बाटल्या ताब्यात घेवून त्या बाटल्या महिलांनी फोडून टाकल्या आहेत.अनेक दिवस झाले तक्रारी असूनही त्याच्यावर कारवाई होत नव्हती. तुळसण या गावातील महिलांनी एकत्र येवून दारू अड्डा उध्वस्त केला आहे.