Tulsi Benefits | चमत्कारी आहेत ‘या’ तुळशीचे फायदे, जाणून घ्या कसा करावा वापर

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Tulsi Benefits | तुळशीच्या औषधी गुणधर्मामुळे अनेक आयुर्वेदिक आणि निसर्गोपचार रुग्णालयांमध्ये औषधी वनस्पती बनवण्यासाठीही तिचा वापर केला जातो. या ’वैद्यकीय औषधी वनस्पती’च्या अनेक जाती आहेत, त्यापैकी राम तुळस आणि कृष्ण तुळस सर्वात सामान्य आहेत. पण दोघांमध्ये काय फरक आहे आणि चांगल्या आरोग्यासाठी तुम्ही कोणती निवडावी, ते जाणून घेवूयात. (Tulsi Benefits)

 

राम तुळस आणि कृष्ण तुळस यांच्यातील फरक स्पष्ट करताना, आहारतज्ज्ञ डॉ. प्रियंका रोहतगी म्हणाल्या, राम तुळशीचा वापर बहुतेक पूजेत केला जातो. ही तुळस तिच्या औषधी गुणधर्मांसाठी प्रसिद्ध आहे. तुळशीच्या या जातीच्या पानांना गोड चव असते. कृष्ण तुळशीची पाने हिरवी व जांभळ्या रंगाची असतात आणि देठ जांभळ्या रंगाचा असतो. (Tulsi Benefits)

 

वेद क्युअरचे संस्थापक आणि संचालक विकास चावला यांनी राम तुळशीबद्दल सांगितले की, या तुळशीला हिंदू धर्मात रामबाण उपाय म्हटले जाते. धार्मिक पूजेसाठी याचा वापर केला जातो. विकास चावला यांनी कृष्णा तुळशीबद्दलही म्हटले की, कृष्ण तुळशीचे पान जांभळ्या रंगाचे असते. ही तुळस कमी वापरली जाते, पण तिचे अनेक औषधी फायदेही आहेत.

 

तज्ज्ञांच्या मते, दोन्ही तुळशींचे औषधी फायदे आहेत. फिटनेस एक्स्प्रेसचे संचालक अंकित गौतम म्हणाले, दोन्ही तुळस ताप, त्वचा रोग, पचन आणि रोगप्रतिकारशक्ती बरे करण्यासाठी वापरल्या जातात. लोक चिंता आणि तणाव कमी करण्यासाठी देखील याचा वापर करतात. वजन कमी करण्यासाठी तुळशीचे पाणी वापरले जाते, असे एका संशोधनातून समोर आले आहे. याच्या सेवनाने सर्दी-खोकलाही दूर होतो.

 

चावला यांनी तुळशीला निसर्गाची देणगी म्हटले आहे. राम तुळस पचनासाठी फायदेशीर आहे.
कृष्णा तुळशीबद्दल त्यांनी सांगितले की, त्वचारोग आणि इतर अनेक आजारांवर ती औषध म्हणून वापरली जाते.

राम तुळस एक नैसर्गिक बूस्टर आहे. ती तणाव आणि उच्च रक्तदाब कमी करण्यासाठी वापरली जाते.
त्यात कर्करोगविरोधी गुणधर्म आहेत आणि आरोग्य आणि पचन सुधारण्यास मदत करते.

 

कृष्णा तुळस लहान मुलांना खायला दिली जाते. सर्दी-खोकल्याचा त्रास, खूप तापावरही ती फायदेशीर आहे.
त्यातील अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म हृदयाच्या समस्या आणि मधुमेहासाठी देखील चांगले आहेत.
यामुळे त्वचा चमकदार होते आणि केसांची लांबीही वाढते.

 

कशी सेवन करावी
डॉ. गौतम यांनी सांगितले की, तुळशीची दोन-तीन पाने रोज रिकाम्या पोटी खावीत.
त्याचा चहा आणि काढा बनवता येतो. यामुळे रक्त स्वच्छ होण्यास मदत होते.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Tulsi Benefits | tulsi health benefits rama tulsi and shyama tulsi which is healthier

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Chickenpox in Children | जाणून घ्या मुलांना चिकनपॉक्स झाल्यास काय करावे आणि काय करू नये?

Brain Stroke | डोकेदुखी किंवा चक्कर येणे, ‘या’ अतिशय सामान्य लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष; ब्रेन स्ट्रोकचा वाढू शकतो धोका!

Diabetes and Infertility | डायबिटीजमध्ये प्रजनन क्षमतेवर होतो परिणाम, जाणून घ्या पुरुषांनी कोणती काळजी घ्या