तुळशीच्या पानांनी ‘असं’ करा वजन कमी, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   तुळशी आणि तुळशीची पाने बर्‍याच वर्षांपासून आयुर्वेदिक उपचारांमध्ये वापरले जात आहेत. हे आरोग्यासाठी खूप चांगले असते. सर्दी, खोकला, घसा खवखवल्यावर तुळशीच्या पानांपासून तयार केलेला काढा पिल्याने चुटकीसरशी शारीरिक समस्या दूर होतात. सकाळी रिकाम्या पोटी तुळशीची पाने (Tulsi leaves for weight loss) चावून खाल्ल्याने आणि त्यापासून बनविलेला चहा पिल्याने आपण दीर्घ आयुष्य निरोगी राहू शकता.

तुळशीच्या पानांमध्ये काही औषधी गुणधर्म असतात जे आपल्याला बर्‍याच रोगांपासून वाचवू शकतात. याने शरीराची प्रतिकारशक्ती देखील मजबूत होते. त्यामुळे आपणास कोणत्याही विषाणूची लागण त्वरीत होऊ शकत नाही. हेच कारण आहे की आज कोरोना साथीचा सामना करण्यासाठी रोगप्रतिकारक शक्तीस चालना देण्यासाठी तुळशीचा काढा पिण्याचा सल्ला दिला जातोय. एवढेच नाही तर तुळशीच्या पानांनी आपले वजनही कमी करता येते. कसे ते जाणून घेऊ.

तुळशीची पाने चयापचय वाढवतात

तुळशीची पाने शरीरातील चयापचय (Metabolism) वाढवतात. ही पाने खाल्ल्याने चयापचयामध्ये सुधारणा होते. यामुळे कॅलरी जलद बर्न होते. यामुळे अन्न उर्जेमध्ये बदलते. जेव्हा शरीराचे चयापचयाची क्रिया सुधारते तेव्हा वजन वेगाने कमी होते. यामुळे शरीरात जमलेली चरबी बर्न होते.

पचन शक्ती सुधारते

पचन शक्ती चांगली राहिल्यास वजन कमी करण्यास मदत होते. यासाठी तुम्ही तुळशीचा चहा प्यावा. सकाळी तुळशीची पाने खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते. शरीरात चांगले बॅक्टेरिया विकसित होतात. आतड्याची हालचाल चांगली होते, ज्यामुळे वजन कमी होण्याच्या प्रक्रियेस वेग येतो.

यकृत निरोगी राहते

तुळशीचा चहा पिण्यामुळे शरीरातील विषारी द्रव्य बाहेर येते. हे वजन कमी करण्यास देखील मदत करते. यकृत पचन प्रक्रियेस मदत करतो आणि शरीरास आतून स्वच्छ करतो. यकृत शरीरातून विषारी पदार्थ काढून टाकतो आणि शरीरातील चरबी कमी करतो. ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांनी दररोज तुळशीची पाने किंवा त्यापासून बनवलेला चहा घ्यावा.

तुळशीच्या पानांच्या चहामध्ये कॅलरी नसतात

तुळशीपासून बनवलेल्या चहात अजिबात कॅलरी नसतात, म्हणून त्याचे सेवन केल्यास वजन वाढत नाही. जर आपण जिममध्ये जाऊन वजन कमी करत असाल, आपले शरीर तंदुरुस्त बनवित असाल तर अधिक कॅलरीज बर्न करण्यासाठी जिममध्ये जाण्यापूर्वी तुळशीचा चहा प्यावा. यामुळे तग धरण्याची क्षमता वाढेल आणि अधिक मेहनत घेत तुम्ही त्वरीत तुमची चरबी बर्न करण्यास सक्षम व्हाल.

वजन कमी करण्यासाठी तुळशीचा वापर

जर आपणास वजन कमी करायचे असेल तर आपण सकाळी उपाशी पोटी तुळशीची पाने चावावी. चवीने थोडे कडवट असतात, पण कारल्यासारखे कडू नसतात. त्यामुळे तुम्ही ते सहज खाऊ शकता. तुळशीचा चहा बनवण्यासाठी एक कप पाण्यात 5-7 तुळशीच्या पानांना टाकून उकळावे. हवे तर आपण यात तुळशीचे बीज, पुदिन्याची पाने, लिंबाचा रस देखील घालू शकता. ते थंड किंवा हलके कोमट झाल्यास प्यावे.