Tulsi Vivah 2020 : ’या’ 8 मंगलाष्टकांनी करा तुळशीचं लग्न ! दूर होतील सगळे विघ्न, जाणून घ्या मुहूर्त

पोलीसनामा ऑनलाइन – दिवाळीनंतर महाराष्ट्रात सर्वांनाच प्रतिक्षा असते ती ‘तुळशी-शाळीग्राम’ विवाहाची. घरोघरी साजरे होणारे हे पहिले शुभकार्य आता अवघ्या दोन दिवसांवर आले आहे. तुळशी विवाहानंतर लग्नसराईला सुरूवात होते. अंगणात असणार्‍या तुळशीचे स्त्रीया दररोज मनोभावे पूजन करतात. ही तुळस म्हणजेच ज्येष्ठ कन्या असे समजले जाते. त्यामुळे तिच्या विवाहानंतरच घरातील शुभकार्यांना सुरूवात होते. तुळशी-शाळीग्राम विवाहासाठी कोणती तयारी करावी, सजावट कशी करावी आणि कोणत्या मंगलाष्टका म्हणाव्यात हे आपण जाणून घेणार आहोत.

अशी करा तयारी
तुळशी विवाहासाठी तुळशीवृंदावन स्वच्छ व सुशोभित करावे. वृंदावनासमोर सडा-रांगोळी टाकावी. बाळकृष्ण व तुळशी यांची एकत्र षोडशोपचार पूजा करावी. फराळ, मिठाईचा नैवेद्य दाखवावा. उपस्थितांना अक्षता वाटून विधीवत लग्नविधी करून मंगलाष्टक म्हणाव्यात. सनई-चौघडे वाजवावे. सर्वांना प्रसाद, फराळ वाटप करावा.

तुळशी विवाहाचे शुभ मुहूर्त
प्रामुख्याने कार्तिक शुद्ध द्वादशीला तुलसी विवाह करतात. 25 नोव्हेंबरला कार्तिकी म्हणजेच प्रबोधिनी एकादशी किंवा देवउठनी एकादशी आहे. या एकादशीचा दुसरा दिवस द्वादशीचा असतो. कार्तिक पौर्णिमेपर्यंत म्हणजेच त्रिपुरी पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह केले जातात. यासाठी काही शुभ मुहूर्त असतात.

तुळशी विवाहासाठी शुभ मुहूर्त
एकादशी प्रारंभ 25 नोव्हेंबर मध्यरात्री 2.45 पासून सुरू
एकादशी समाप्त 26 नोव्हेंबर सकाळी 5.10 मिनीटांपर्यंत
द्वादशी प्रारंभ 26 नोव्हेंबर सकाळी 5.10 मिनीटांपासून
द्वादशी प्रारंभ 27 नोव्हेंबर सकाळी 7.46 मिनीटांपर्यंत

तुळशी विवाहाची मंगलाष्टके
1- ॐ श्री मत्पंकजविष्टरो हरिहरौ, वायुमर्हेन्द्रोऽनलः। चन्द्रो भास्कर वित्तपाल वरुण, प्रताधिपादिग्रहाः। प्रद्यम्नो नलकूबरौ सुरगजः, चिन्तामणिः कौस्तुभः, स्वामी शक्तिधरश्च लांगलधरः, कुवर्न्तु वो मंगलम॥

2- गंगा गोमतिगोपतिगर्णपतिः, गोविन्दगोवधर्नौ, गीता गोमयगोरजौ गिरिसुता, गंगाधरो गौतमः। गायत्री गरुडो गदाधरगया, गम्भीरगोदावरी, गन्धवर्ग्रहगोपगोकुलधराः, कुवर्न्तु वो मंगलम॥

3- नेत्राणां त्रितयं महत्पशुपतेः अग्नेस्तु पादत्रयं, तत्तद्विष्णुपदत्रयं त्रिभुवने, ख्यातं च रामत्रयम। गंगावाहपथत्रयं सुविमलं, वेदत्रयं ब्राह्मणम, संध्यानां त्रितयं द्विजैरभिमतं, कुवर्न्तु वो मंगलम॥

4- बाल्मीकिः सनकः सनन्दनमुनिः, व्यासोवसिष्ठो भृगुः, जाबालिजर्मदग्निरत्रिजनकौ, गर्गोऽ गिरा गौतमः। मान्धाता भरतो नृपश्च सगरो, धन्यो दिलीपो नलः, पुण्यो धमर्सुतो ययातिनहुषौ, कुवर्न्तु वो मंगलम॥

5- गौरी श्रीकुलदेवता च सुभगा, कद्रूसुपणार्शिवाः, सावित्री च सरस्वती च सुरभिः, सत्यव्रतारुन्धती। स्वाहा जाम्बवती च रुक्मभगिनी, दुःस्वप्नविध्वंसिनी, वेला चाम्बुनिधेः समीनमकरा, कुवर्न्तु वो मंगलम॥

6- गंगा सिन्धु सरस्वती च यमुना, गोदावरी नमर्दा, कावेरी सरयू महेन्द्रतनया, चमर्ण्वती वेदिका। शिप्रा वेत्रवती महासुरनदी, ख्याता च या गण्डकी, पूर्णाः पुण्यजलैः समुद्रसहिताः, कुवर्न्तु वो मंगलम॥

7- लक्ष्मीः कौस्तुभपारिजातकसुरा, धन्वन्तरिश्चन्द्रमा, गावः कामदुघाः सुरेश्वरगजो, रम्भादिदेवांगनाः। अश्वः सप्तमुखः सुधा हरिधनुः, शंखो विषं चाम्बुधे, रतनानीति चतुदर्श प्रतिदिनं, कुवर्न्तु वो मंगलम॥

8- ब्रह्मा वेदपतिः शिवः पशुपतिः, सूयो ग्रर्हाणां पतिः, शुक्रो देवपतिनर्लो नरपतिः, स्कन्दश्च सेनापतिः। विष्णुयर्ज्ञपतियर्मः पितृपतिः, तारापतिश्चन्द्रमा, इत्येते पतयस्सुपणर्सहिताः, कुवर्न्तु वो मंगलम॥

You might also like