तुळशीचं लग्न लावण्याची ‘ही’ योग्य पध्दत, जीवन होईल आनंदी, जाणून घ्या

नवी दिल्ली, वृत्तसंस्था – तुळशी विवाहाचा यंदा 9 नोव्हेंबरचा मुहूर्त आहे. देवप्रबोधनी एकादशीच्या दिवशी तुळशी विवाह करण्याची परंपरा प्रचलित आहे. मानले जाते की जे लोक कन्या सुखापासून वंचित आहे जर त्यांनी प्रभू शालिग्रामबरोबर तुळशी विवाह केला तर त्यांना कन्या रत्न प्राप्त होते. या दिवसापासून लोक सर्व शुभ कार्यांना सुरुवात करतात. असे देखील प्रचलित आहे की तुळशी विवाह केल्याने वैवाहिक जीवन सुखी होते.

कसा करावा तुळशी विवाह –
1. तुळशीचे लग्न लावताना तुळशीला मोकळ्या वातारणात ठेवा ( उदा. अंगणात)
2. ऊसाने तुळशी विवाहाचा मंडप तयार केला.
3. तुळशीवर लाल रंगाची ओढणी टाका.
4. त्यानंतर तुळशीसमोर प्रभु विष्णूचे अवतार शालिग्राम ठेवा.
5. त्यानंतर दुध हळदीचा नैवेद्य तुळशीला आणि प्रभू शालिग्रामसमोर ठेवा.
6. विवाहावेळी मंगलाष्टकाचे पठन करावे.
7. तुळशी आणि प्रभू शालिग्राम यांच्या विवाह दरम्यान तुळशीला प्रदक्षिणा घाला.
8. त्यानंतर विवाहातील प्रसाद वाटप करा.
9. विवाह झाल्यावर कुटूंबियांनी प्रभू शालिग्रामची पूजा अर्चा करावी. त्यावेळी जप करताना ‘उठो देव सांवरा, भाजी, बोर आंवला, गन्ना की झोपड़ी में, शंकर जी की यात्रा’ असे म्हणा.
10. याचा अर्थ सावळा देव. भाजी बोरं, आवळा हा नैवेद्य दाखवल्यानंतर आम्हाला इच्छा आहे की तुम्ही सृष्टीचे कार्य संभाळाल आणि शंकराला पुन्हा आपल्या यात्रेची अनुमती द्याल.

Visit : Policenama.com