Tulsidas Balaram Passes Away | भारतीय फुटबॉलपटू तुलसीदास बलराम यांचे निधन; वयाच्या 86 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

पोलीसनामा ऑनलाईन टीम : क्रीडा विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. दिग्गज भारतीय फुटबॉलपटू तुलसीदास बलराम (Tulsidas Balaram Passes Away) यांचे आज निधन झाले आहे. ते 86 वर्षांचे होते. बलराम यांनी ऑलिम्पिक आणि आशियाई खेळांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले होते. तुलसीदास बलराम यांच्या निधनामुळे क्रीडा विश्वावर मोठी शोककळा पसरली आहे. त्यांचे बहुतांश अवयव खराब झाल्याने त्यांचे निधन झाले आहे. त्यांच्यावर कोलकाता येथील रुग्णालयात उपचार सुरु होते. तुलसीदास बलराम (Tulsidas Balaram Passes Away) यांना डिसेंबर महिन्यात पोट आणि लघवी संबंधित समस्येमुळे उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्यांच्या प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्यांना आयसीयूमध्ये हलवण्यात आले.

क्रिडा जगतावर शोककळा
26 डिसेंबर रोजी तुलसीदास बलराम यांची प्रकृती अचानक खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना युरिनरी इन्फेक्शन झाले होते. तेव्हापासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नव्हती. यादरम्यान त्यांच्यावर उपचार सुरु असताना गुरुवारी 16 फेब्रुवारी रोजी दुपारी अखेरचा श्वास घेतला. तुलसीदास बलराम यांच्या निधनावर (Tulsidas Balaram Passes Away) मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासह केंद्रीय क्रिडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी शोक व्यक्त केला आहे.

तुलसीदास बलराम यांची कारकीर्द
दिग्गज भारतीय फुटबॉलपटू तुलसीदास बलराम 50 आणि 60 च्या दशकातील भारतातील सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटूंपैकी एक होते.
बलराम यांनी मेलबर्न येथे 1956 ऑलिम्पिकच्या उपांत्य फेरीत आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये पदार्पण केले होते.
त्या ऑलिम्पिकमध्ये भारत ४थ्या क्रमांकावर होता. फुटबॉलमधील ही भारताची सर्वोत्तम कामगिरी होती.
तुलसीदास बलराम यांनी 1962 साली आशियाई खेळांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करताना सुवर्णपदक जिंकले होते.
बलराम यांनी 1960 च्या रोम ऑलिम्पिकमध्येही भाग घेतला होता.
1960 च्या रोम ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने केलेल्या तीन गोलपैकी दोन गोल बलराम यांनी केले होते.

 

Web Title :- Tulsidas Balaram Passes Away | tulsidas balaram legendary indian footballer passes away aged 86 famous football player and olympian tulsidas balaram

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Rudraksh Mahotsav in Sehore | धक्कादायक! रुद्राक्ष महोत्सवामध्ये झालेल्या धक्काबुक्कीत बुलडाण्यातील 3 महिला बेपत्ता

Pune Crime News | पत्नीचा गळा दाबून खून करुन पतीने विष प्राशन करुन केला आत्महत्येचा प्रयत्न

Pune Crime News | अभ्यास करताना मोबाईल पाहतो, म्हणून रागविल्याने १२ वीतील मुलाने आईचा गळा दाबून केला खून, पुण्यातील घटना