दस, तथास्तु, रा-वन या मोठ्या सिनेमांचा दिग्दर्शक होता ‘इंजिनिअर’, या सिनेमातून केला ‘डेब्यू’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मुल्क, तुम बिन, रा वन सारख्या चित्रपटाचे दिग्दर्शन केलेले डायरेक्टर प्रोड्यूसर आणि लेखक अनुभव सिन्हा यांचा आज ५४ वा वाढदिवस आहे. अनुभव यांचा जन्म २२ जूनला इलाहाबादमध्ये झाला होता. त्यांचे स्कूलिंग गढवाल मधून झाले. त्यांनी त्यांचे इंटरमीडिएट चे शिक्षण इलाहाबाद आणि वाराणसी मधून पुर्ण केले. नंतर त्यांनी मुस्लिम यूनिवर्सिटीमधून १९८८ मध्ये मॅकेनिकल इंजीनियरिंगची डिग्री घेतली. चित्रपटात जाण्याआधी अनुभव यांनी दोन वर्षे दिल्लीमध्ये इंजीनियर पदावर काम केले.

मुबंईला गेल्यानंतर अनुभव यांनी १९९४ पर्यंत पाराशरसोबत असिस्टंट डायरेक्टरचे काम केले. त्यांनी झीटिव्हीवर स्वतंत्र दिग्दर्शकाच्या रुपामध्ये ही काम केले होते. त्यांनी दिग्दर्शन केलेली ‘शिकस्त’ सीरीयल टेलीविजनवर प्रसिद्ध झाली. सन २००० मध्ये चित्रपट ‘तुम बिन’ मधून त्यांनी चित्रपट करिअरमध्ये सुरुवात केली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफीसवर सुपरहिट ठरला होता.

त्यांनी आत्तापर्यंत ‘आपको पेहले भी कहीं देखा है’, ‘दस’, ‘तथास्तु’, ‘कैश’, ‘रा वन’, ‘तुम बिन २’ असे अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. या सर्व चित्रपटांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्यांचा आगामी चित्रपट ‘आटर्किल १५’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटिला येणार आहे. या चित्रपटात अभिनेता आयुष्मान खुराना याने मुख्य भूमिका साकारली आहे.