‘स्टार किडसाठी मला सिनेमातून काढलं’, ‘तुंबाड’मधील अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   बॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूत यानं दि 14 जून 2020 (वार-रविवार) गळफास घेऊन आत्महत्या केली आणि जगाचा निरोप घेतला. सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर आता घराणेशाहीचा मुद्दा जोरावर आहे. अनेकजणांचं म्हणणं हे की, बाहेरून येणाऱ्या लोकांसाठी इंडस्ट्रीत टिकणं काही लोक मुश्किल करत आहेत. बॉलिवूडमधील पॉलिटीक्स आणि गटबाजीवरूनही बोललं जात आहे. इतकंच नाही तर इतरही अनेक लोक बोलते झाले आहेत आणि आपले इंडस्ट्रीतले अनुभव सांगत आहेत. आता पर्यंत अनेक कलाकारांनी नेपोटीजम आणि गटबाजीवरील त्यांचं मत मांडलं आहे. आता तुंबाड फेम अभिनेत्री रोंजिनी चक्रवर्ती हिनंही तिचा अनुभव सांगितला आहे.

एका मुलाखतीत बोलताना रोंजिनीनं धक्कादायक खुलासा केला आहे. रोंजिनी म्हणाली, “असं अनेकदा होतं. एका स्टार किडसाठी मलाही सिनेमातून काढण्यात आलं होतं. त्यांना एक प्रसिद्ध चेहरा हवा होता. प्रत्येक क्षेत्रात असं होतं आणि या इंडस्ट्रीत तर सर्वात जास्त होतं असं मला वाटतं. तुम्हाला टिकून राहयचं असेल तर खूप मेहनत करावी लागते. नाही तर दुसऱ्या कलेकडे वळावं लागेल.”

रोंजिनी पुढं म्हणाली, “प्रेक्षक हा स्टार आहे असं मी मानते. मला पाहण्यासाठी त्यांनी 500 रुपये खर्च करावेत इतक्या ताकदीची अभिनेत्री मी होणं गरजेचं आहे. मला अभिनयाच्या जोरावर प्रेक्षक कमावण्याची गरज आहे.” असंही ती म्हणाली.

रोंजिनीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर 2012 साली आलेल्या सिडनी विथ लव्ह या सिनेमातून तिनं बॉलिवूड डेब्यू केला होता. 2018 साली आलेल्या तुंबाड सिनेमानं तिला खरी ओळख मिळाली. तिनं सिंबा आर्टीकल 15 अशा सिनेमातही काम केलं आहे. याशिवाय तिनं रक्तांचल, लाल बाजार अशा काही वेब सीरिजमध्येही काम केलं आहे. लवकरच ती रक्तांचलच्या दुसऱ्या सीजनमध्ये काम करताना दिसणार आहे.