Tunisha Sharma Death | तुनिषा शर्माच्या पोस्टमॉर्टममध्ये मोठा खुलासा; मृत्यूचे कारण आले समोर

पोलीसनामा ऑनलाईन टीम – Tunisha Sharma Death | टीव्ही इंडस्ट्रीची प्रसिद्ध अभिनेत्री तुनिषा शर्माच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. याच तुनिषा शर्माचे आज पहाटे मुंबईतील जेजे रुग्णालयात पोस्टमॉर्टम करण्यात आले. पोस्टमार्टममध्ये अनेक मोठे खुलासे झाले आहेत. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये गुदमरल्यामुळे मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे. फाशी घेतल्यानंतर गुदमरल्याने मृत्यू झाला होता. त्याचवेळी पोलिस सूत्रांनी गर्भधारणेचे प्रकरण फेटाळून लावले आहे. शरीरावर जखमेचे कोणतेही निशाण नाही आहे. (Tunisha Sharma Death)

तुनिषाच्या आईने सहकलाकार शीजान खान विरोधात गुन्हा दाखल केला होता, त्यानंतर मुंबईच्या वालीव पोलिसांनी अभिनेत्री तुनिषा शर्माचा सहकलाकार शीजान खानला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अटक केली होती. पोलिसांनी भादंवि कलम 306 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. त्याला उद्या न्यायालयात हजर केले जाणार आहे. टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माचा सह-अभिनेता पार्थ झुत्शी म्हणाला, “मला पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले होते आणि नेहमीचे प्रश्न विचारले गेले. मी तिच्या संबंधांवर भाष्य करू शकत नाही, मला कल्पना नाही, ही तिची अंतर्गत बाब होती. ही घटना घडल्यावर मला समजले कि तिने आत्महत्या केली आहे. (Tunisha Sharma Death)

2016 साली आलेल्या ‘फितूर’ चित्रपटात तुनिषा शर्माने कतरिना कैफच्या बालपणीची भूमिका साकारली होती.
‘फितूर’ व्यतिरिक्त ती ‘बार बार देखो’, ‘कहानी 2’, ‘दबंग 3’ सारख्या चित्रपटांमध्ये दिसली होती.
तुनिषा शर्माने ‘शेर-ए-पंजाब महाराजा रणजीत सिंह’ या मालिकेत मेहताब कौरची भूमिका साकारली होती.
सध्या ती कलर्स टीव्हीच्या इंटरनेट वाला लव्हमध्ये अध्या वर्माची भूमिका साकारत होती.

 

Web Title :- Tunisha Sharma Death | tunisha sharma funeral this was revealed in the postmortem of actress tunisha sharma now preparations for the funeral

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

MP Sanjay Raut | बिल्डर सूरज परमारच्या डायरीत कुणाचं नाव? संजय राऊतांची SIT चौकशीची मागणी

Ashish Shelar | संजय राऊतांनी रावणरक्षा वाचण्यापेक्षा रामरक्षा वाचावी – आशिष शेलार

Shambhuraj Desai | ‘बाळासाहेबांनी इतरांना आधार दिला आता त्यांच्याच मुलाला आणि नातवाला…’; शंभूराज देसाईंची उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र