6.7 तीव्रतेच्या भूकंपाने तुर्कीत ‘हाहाकार’, 18 जणांचा मृत्यू

तुर्की : वृत्त संस्था – तूर्कीमध्ये भूकंपाने मोठा विध्वंस केला आहे. शनिवारी आलेल्या भूकंपामुळे तुर्कीमध्ये सुमारे 18 लोकांचा मृत्यू झाला. 200 पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. तर रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 6.7 नोंदली गेली आहे. भूकंपामुळे सुमारे 10 इमारती कोसळल्या आहेत. या भूकंपात सर्वात जास्त नुकसान पूर्व इलाजिग प्रांतात झाले आहे. भूकंपादरम्यान 15 वेळा धक्के बसले, यामुळे लोकांमध्ये प्रचंड भिती आणि दहशत निर्माण झाली आहे. भूकंपाचे धक्के शेजारील देश इराक, सीरिया लेबनानमध्येही जाणवले. परंतु, या देशांमध्ये कोणतेही नुकसान झाल्याचे वृत्त नाही.

राष्ट्रपती रेसेप तईप एर्दोगन यांनी ट्विटरवर माहिती देताना सांगितले की, भूकंपग्रस्त सर्व लोकांना मदतीसाठी योग्य ती पावले उचलली जात आहेत. या भुकंपामुळे नागरिक भयभित झाले आहेत. आम्ही नागरिकांच्या पाठीशी आहोत. भितीमुळे लोक थंड तापमानात शरीराची उष्णता वाढविण्यासाठी रस्त्यावर आग पेटवत आहेत.

तुर्की सरकारच्या आपत्कालीन व्यवस्था विभागाने (एएफएडी) म्हटले की, तुर्कीला नेहमी भूकंपाचा धोका असतो. तुर्कीमधील टिव्हीने लोकांना भयभित झाल्यावर घरातून बाहेर पळण्याचा व्हिडिओ दाखवला. पर्यावरण आरोग्य मंत्र्यांनी म्हटले की, किमान 18 लोकांचा मृत्यू झाला आहे. यापैकी 13 इलाजगी प्रांतात तर अन्य पाच शेजारील मलाया प्रांतातील आहेत, जो दक्षिण-पश्चिमेला आहे. 553 लोक जखमी झाले आहेत, असे त्यांनी सांगितले. मंत्री सुलेमान सोयलू यांनी सांगितले की, माल्टामध्ये मलब्याखाली कुणीही अडकलेले नाही. परंतु, इलाजमध्ये बचाव कार्यात 30 लोकांना शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे.

फेसबुक पेज लाईक करा –