मुस्लिम धर्मगुरुला 1075 वर्षांची शिक्षा, 1000 गर्लफ्रेंड्ससोबत व्यतीत करत होता आयुष्य

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  तुर्कस्तानमध्ये (Turkey) अदनान ओकतारा (वय 64) या मुस्लीम समाजातील धर्मगुरुला मोठी शिक्षा सुनावण्यात आली आहे. अदनान विरोधात लैंगिक अत्याचार, अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण, फसवणूक, राजकीय तसेच लष्करी हेरगिरीसारखे गंभीर आरोप आहेत. त्यापैकी लैंगिक अत्याचारासंदर्भातील 10 प्रकरणांमध्ये इस्तंबूलमधील एका न्यायालयाने त्याला दोषी ठरवले असून एक हजार 75 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.

2018 मध्ये अदनानला इस्तंबूल पोलिसांनी आर्थिक गुन्ह्यांच्या आरोपाखाली अटक केली. यावेळी अदनानसोबतच इतर 200 हून अधिक संक्षयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. ब्लुमबर्गच्या वृत्तानुसार अदनानविरोधात लैंगिक अत्याचार, अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण, फसवणूक, राजकीय तसेच लष्करी हेरगिरीसारखे गंभीर आरोप ठेवले होते. या सर्व आरोपांपैकी 10 प्रकरणांमध्ये अदनानला दोषी ठरवले आहे. अदनानबरोबरच लैंगिक त्याचारांसंदर्भात त्याच्या ओळखीतील एकूण 236 जणांविरोधात हा खटला चालवण्यात आला. त्यापैकी 78 जणांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान डिसेंबरमध्ये न्यायालयात सुनावणीच्या वेळी अदनानने आणखीन एक धक्कादायक खुलासा केला. आपल्याला एक हजार प्रेयसी आहेत. महिलांबद्दल मला खूप प्रेम आहे. प्रेम हा एक मानवी गुणधर्म असून प्रेम करणे हे मुस्लिम व्यक्तीचे वैशिष्ट्य असते, असेही अदनानने न्यायालयासमोर म्हटले आहे.

1990 च्या दशकामध्ये अदनान हा टर्कीमध्ये पहिल्यांदा चर्चेचा विषय ठरला होता. अदनान ज्या संप्रदायाचे नेतृत्व करायचा त्या संप्रदायातील अनेकांना सेक्स सॅण्डलमध्ये अटक केल्यानंतर तो अचानक प्रकाशझोतात आला. ऑनलाइन माध्यमातून ए नाईन टीव्ही या वाहिनीवरुन 2011पासून अदनान उपदेश करणाऱ्या कार्यक्रमांचे प्रसारण करायचा. या कार्यक्रमामध्ये तो टर्कीमधील धर्मगुरुंवरही टीका करायचा. या वाहिनीला टर्कीमध्ये प्रसारमाध्यमांवर लक्ष ठेवणाऱ्या आरटीयूकेने अनेकदा दंडही केला आहे. अखेर सरकारनेच या वाहिनीच्या प्रसारणावर 2018 साली बंदी घातली. अदनानच्या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या अनेक महिलांनी सुंदर दिसण्यासाठी प्लास्टिक सर्जरीचा आधार घेतल्याचा दावाही केला जातो.

अदनानविरोधातील या प्रकरणाच्या सुनावणीमध्ये एका महिलेने काही खळबळजनक आरोप केले. अदनानने अनेकदा आपले अनेकदा लैंगिक शोषण केल्याचा आरोप या महिलेने केला आहे. अदनान अनेक महिलांचे लैंगिक शोषण करायचा असेही या महिलेने म्हटले आहे. अदनान ज्या महिलांचे लैंगिक शोषण करायचा त्यांच्यावर तो गर्भनिरोधक गोळ्या घेण्यास भाग पाडायचा असा दावाही या महिलेने केला आहे. अदनानच्या घरातून 69 गर्भनिरोधक गोळ्या तपास यंत्रणांनी जप्त केल्यात.