तुर्कीचा सीरियावर ‘ड्रोन’ हल्ला, 19 सैनिकांचा मृत्यू, 2 लढाऊ विमान ‘उध्वस्त’

बगदाद : वृत्त संस्था – सीरियातील शासनाच्या विरोधात केलेल्या आक्रमक हल्ल्यात तुर्कीने रविवारी सीरियाची दोन लढावू विमाने पाडली. उत्तर-पश्चिम सीरियातील इदलिब प्रांतात अनेक आठवडे सुरू असलेल्या हिंसाचारानंतर, तसेच मागच्या आठवड्यात सीरियाई हवाई हल्ल्यात अनेक तुर्की सैनिक मारले गेल्यानंतर तुर्कीने रशिया समर्थक सीरिया सेनेच्या विरूद्ध एक संपूर्ण लष्करी मोहिम सुरू केल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

एका वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, तुर्कीच्या ड्रोन स्ट्राइकमुळे सीरियाचे 19 सैनिक मरण पावले आहेत. या घटनेमुळे रशिया आणि तुर्कीमध्ये तणाव वाढला आहे. परंतु, आम्हाला रशियाशी लढायचे नाही, असे तुर्कीने म्हटले आहे.

तुर्कीच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटले की, एका विमानविरोधी प्रणालीने आमचे एक सशस्त्र ड्रोन पाडले आणि दोन विमानविरोधी प्रणाली नष्ट केल्या आहेत. तसेच आम्ही आमच्या विमानावर हल्ला करणारी सीरियाची दोन एसयू-24 विमाने नष्ट केली आहेत.

सीरियाच्या सरकारी मीडियाने म्हटले की, तुर्की संरक्षण दलांनी इदलिबमध्ये त्यांची दोन विमाने नष्ट केली. एक विद्रोही गट आणि ब्रिटनयेथील युद्ध नियंत्रण संस्था सीरियन ऑब्जर्व्हेटरी फॉर ह्यूमन राइट्स या दोन्हींने दुजोरा देताना म्हटले आहे की, विमाने पाडण्यात आली आहेत.