‘स्मार्टफोन’ला बनवा तुमच्या घराची ‘चावी’, जाणून घ्या कशी वाढेल ‘कार’ची ‘सुरक्षा’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्या जगात नवनवीन टेक्नोलॉजी येत आहे. या टेक्नोलॉजीमुळे मानवाचे जीवन सुखमय झाले असून अनेकवेळा माणसाचे काम मशिनदेखील करत आहे. आता यासंदर्भात नवीन माहिती समोर आली असून एनएक्सपी सेमीकंडक्टरने नवीन घोषणा केली आहे. यामध्ये त्यांनी अल्ट्रा-वाइडबैंड चिपला ऑटोमोटिव इंटिग्रेटेड सर्किट बरोबर जोडले असून यामध्ये तुम्ही तुमच्या मोबाईल फोनला गाडीच्या चावीमध्ये बदलू शकता.

मिळालेल्या माहितीनुसार, या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून यूडब्ल्यूबी गाड्या, मोबाईल फोन आणि बाकीच्या स्मार्ट डिव्हाइसचे असणारे उपयोग समोर आणण्यासाठी होणार आहे. या टेक्नॉलिजीमधून गाडीचा मालक कोण आहे हे समजणे फार सहज होणार आहे. यामुळे गाडीच्या सुरक्षेत देखील वाढ होणार आहे आणि गाडी चोरी जाण्याच्या घटना देखील कमी होणार आहे.

अशा प्रकारे काम करते चिप
या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून कारमालक आपली गाडी स्मार्टफोनच्या मदतीने चालू किंवा बंद करू शकतात. त्याचबरोबर सुरक्षित पार्किंगचा आनंद देखील घेऊ शकता. लवकरच ग्राहकांना हि टेक्नॉलॉजी उपलब्ध करून दिली जाणार असून यावर आणखी संशोधन सुरु असल्याची माहिती कंपनीने दिली आहे.

 

Visit : Policenama.com