‘ब्लॅकहेड्स’ ताबडतोब घालवते ‘हळद-कोकोनट’ ऑईलची ही जादुई पेस्ट, जाणून घ्या ‘हे’ 4 फायदे

ब्लॅकहेड्स त्वचेची अशी समस्या आहे जी 85 टक्के लोकांना त्रासदायक ठरत आहे. यावर केमिकलयुक्त प्रॉडक्ट्स आहेत, परंतु त्यांचा कायस्वरूपी लाभ होत नाही, शिवाय त्वचेचे नुकसान होते. काही घरगुती उपाय आहेत जे ब्लॅकहेड्स दूर करण्यास मदत करतात. हे उपाय कोणते ते जाणून घेवूयात.

हे उपाय करा

1 हळद आणि कोकोनट ऑईल
एक छोटा चमचा हळद पावडर सोबत एक चमचा खोबरेल ते घ्या. आता हे व्यवस्थित मिक्स करा. ही पेस्ट प्रभावित जागेवर लावा आणि 10 ते 15 मिनिटे तसेच राहू द्या. नंतर कोमट पाण्याने धुवून घ्या. हा उपाय आठवड्यातून तीन वेळा करा.

2 दालचीनी आणि लिंबूरस
दोन चमचे लिंबूरससोबत दोन चमचे दालचिनी पावडर मिसळा. ही पेस्ट 20 मिनिटे लावून ठेवा आणि नंतर कोमट पाण्याने धुवून टाका. आठवड्यात 2 वेळा हा उपाय करा.

3 ग्रीन टी
पाण्यात ग्रीन टी पाउडर उकळवा आणि जोपर्यंत घट्ट होत नाही तोपर्यंत गॅस बंद करू नका. थंड झाल्यानंतर हे मिश्रण प्रभावित जागेवर 15 ते 20 मिनिटे लावून ठेवा. नंतर कोमट पाण्याने धुवून टाका.

4 अंडे आणि मध
एकच चमचा मधासोबत एक अंड्याचा सफेद भाग मिसळून घ्या. हे मिश्रण आपल्या चेहर्‍यावर लावा आणि सुखू द्या. आता कोमट पाण्याने धुवून टाका. हा उपाय खुप प्रभावी आहे.