हळदीचे ‘हे’ दोन फेसपॅक वापरून तुम्ही दिसाल तजेलदार

पोलीसनामा ऑनलाइन टीम – रतात हळदीला मोठे महत्व आहे आणि जेव्हा जेव्हा त्वचेसंबंधित काहीही असेल तेव्हा सर्वात आधी नाव घेतले जाते ते हळदीचे. घरगुती पर्याय पण सर्वात उत्तम पर्याय म्हणून हळदीचा वापर होतो. जेव्हा चेहरा खुलून दिसावा म्हणून चेहऱ्याला काही लावण्याची वेळ येते तेव्हा सर्वात आधी हळदीचा उपाय सुचवला जातो. हळदीत असलेले झिंक पिंपल्स आणि अँक्ने घालवतात. तसेच स्किन टोन सारख्या समस्या असतील आणि स्कीन टोन दूर करायचा असेल तर मग बेसन उपायकारी ठरते. याशिवाय बेसन त्वचा तजेलदार राखण्यास देखील मदत करते.

त्यासाठीच आम्ही तुम्हाला सांगणार आहोत असे फेसपॅक जे बेसनापासून बनवले जातात आणि हे फेसपॅक तुमच्या त्वचेला करु शकता तजेलदार –

बेसन, लिंबू आणि दूधाचा पॅक –

– हा पॅक बनवण्यासाठी यात आधी 3 ते 4 चमचे बेसन घेऊन त्यात लिंबाचे काही थेंब टाकावे आणि त्यात     2-3 चमचे कच्चे दूध टाकावे.
– चेहरा स्वच्छ करा आणि क्लिंजरच्या मदतीने चेहरा साफ करा.
– त्यानंतर फेसपॅक चेहऱ्याला लावून तो अर्ध्यातासाने हलक्या हाताने मसाज करुन धूवून टाका.
– या फेसपॅकमध्ये कच्च्या दूधाऐवजी दूधाची मलाई देखील वापरु शकतात. हे बसेन कोरड्या त्वचेसाठी      उत्तम ठरते. यासाठी तुम्ही बेसन मध्ये केळ टाकून चेहऱ्यावर लावू शकतात.

बेसन आणि हळदीचा फेसपॅक –
या पॅकचा वापर त्वचेचा रंग उजळण्यासाठी केला जातो. यात हळदीसोबत बेसन आणि थोडे चंदन तसेच 3 – 4 थेंब गुलाब पाणी एकत्र करुन वापरू शकतात. आता हे चेहऱ्यावर व्यवस्थित लावा आणि त्यानंतर एका तासाने स्वच्छ धुवून टाका.

फेसबुक पेज लाईक करा –