Turmeric For Sugar Control | शुगर कंट्रोल करतो हळदीचा चहा, जाणून घ्या कसा करावा वापर

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Turmeric For Sugar Control | आयुर्वेदात हळदीचे (Turmeric) अनेक आजारांवर उपचार सांगितले गेले आहेत. 2017 मध्ये फूड जर्नलमध्ये (Food Journal) प्रकाशित झालेल्या एका संशोधनात असे सांगण्यात आले होते की हळदीमध्ये अँटिऑक्सिडेंट गुणधर्म (Antioxidant properties) आहेत, ज्यामुळे ती अनेक रोगांवर वापरली जाते. फूड जर्नलमध्ये प्रकाशित अहवालानुसार, अल्झायमर (Alzheimer’s), हृदयविकार (Heart Disease), अ‍ॅलर्जी (Allergies), डिप्रेशन (Depression), मल्टिपल स्क्लेरोसिस (Multiple Sclerosis) आणि मधुमेहावरही (Diabetes) हळद फायदेशीर ठरू (Turmeric For Sugar Control) शकते.

 

अभ्यासात असे आढळून आले आहे की, हळद ब्लड शुगर लेव्हल (Blood Sugar Level) मोठ्या प्रमाणात कमी करू शकते. इंडियन जर्नल ऑफ क्लिनिकल बायोकेमिस्ट्रीनुसार (Indian Journal of Clinical Biochemistry), हळदीमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स शरीरात फ्री रॅडिकल्स (Free Radicals) होण्यापासून रोखते. फ्री रॅडिकल्समुळे पेशींमध्ये एजिंग जास्त होते.

 

धुम्रपान, मद्यपान, तळलेले अन्न खाणे इत्यादींमुळे तयार होणारे फ्री रॅडिकल्स दूर होतात. अभ्यासानुसार, मधुमेहामध्ये साखर कमी करण्यासाठी हळद खूप उपयुक्त आहे. मधुमेहामध्ये हळदीचा वापर कसा करावा (Turmeric Tea) ते जाणून घेवूयात…

 

मधुमेहामध्ये हळदीचा चहा (Turmeric Tea For Diabetes) :
हळद तिच्या अँटी-इम्फ्लेमेटरी आणि अँटिऑक्सिडंट गुणधर्मांमुळे टाइप 2 मधुमेहामध्ये (Type 2 Diabetes) रक्तातील साखरेचे अधिक चांगले व्यवस्थापन करू शकते. हळदीचा चहा यासाठी उत्तम (Turmeric For Sugar Control) काम करू शकतो. हळदीचा चहा तुम्ही बाजारातून विकत घेऊ शकता, पण जर तुम्हाला तो घरी बनवायचा असेल तर हळदीमध्ये काही गोष्टी घालाव्या लागतील.

 

हळदीच्या चहामध्ये दालचिनी (Cinnamon) आणि ताजी काळीमिरी (Black Pepper) घाला.
याशिवाय गोड बनवायचा असेल तर साखरेऐवजी मध (Honey) घाला. मधुमेहाच्या रुग्णांवरही मध चांगले काम करते.

 

हळद, काळी मिरी, मध आणि आल्याच्या चहामध्ये अँटी-व्हायरल (Anti-viral Properties)
आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म (Anti-inflammatory Properties) असतात.
हा चहा सर्दी आणि खोकला दूर ठेवण्यास मदत करतो, म्हणून आहारात हळदीचा चहा समाविष्ट करणे आवश्यक आहे.

 

याशिवाय, हळदीचा चहा लिव्हर स्वच्छ करतो (Liver Cleanse), ज्यामुळे लिव्हर योग्यरित्या कार्य करते.
हळद आणि आले (Ginger) दोन्ही पचनतंत्र मजबूत करते.
तसेच वजन कमी करण्यास मदत (Beneficial For Weight Loss) होते. आल्याचा चहा साखर नियंत्रित करतो.

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Turmeric For Sugar Control | amazing health benefits of turmeric tea for diabetic patient know how to make it

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | पोलिस आयुक्तांच्या गंभीर इशार्‍यानंतरही येरवडयात अवैध धंद्ये ‘जोमात’ असल्याचं उघड; उपायुक्तांच्या विशेष पथकाची जुगार अड्ड्यांवरील 32 जणांवर कारवाई

 

Pune Crime | बनावट पदवी प्रमाणपत्रे देऊन MIT ला घातला 57 लाखांना गंडा; कानपूर विद्यापीठाच्या नावाने दिली पदवी प्रमापत्रे, 280 विद्यार्थ्यांची फसवणूक

 

Health Department Exam Paper Leak Case | आरोग्य विभाग पेपर फुटी प्रकरण ! 20 आरोपींवर न्यायालयात 3816 पानांचे दोषारोपपत्र