हळद आहे पोटाच्या कॅन्सरवर गुणकारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – फेडरल युनिव्हर्सिटी ऑफ साओ पाउलो आणि फेडरल युनिव्हर्सिटी ऑफ पाराच्या संशोधकांनी केलेल्या संशोधनातून असे समोर आले आहे की, हळदीच्या झाडाच्या मुळांमधून निघणारे करक्यूमिन पोटाचा कर्करोग म्हणजेच गॅस्ट्रीक कॅन्सर रोखण्यासाठी फायदेशीर असतात. ही माहिती या संशोधकांनी ब्राझीलमध्ये दिली. करक्यूमिनसोबतच हिस्टोन गतिविधीला संशोधित करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका निभावणाऱ्या तत्वांमध्ये कोलकेल्सीफेरोल, रेस्वेरास्ट्रोल, क्वेलसेटिन, गार्सिनॉल आणि सोडियम ब्यूटायरेट हेही प्रमुख आहेत.

पोटाच्या कॅन्सरसाठी योग्यप्रमाणात फॉलो-अप आणि पोस्ट-ट्रीटमेंटची आवश्यकता असते. नियमित तपासणी केली पाहिजे. पोटाच्या कॅन्सरनंतर जीवन तणावपूर्ण होते. मात्र योग्य उपचार, जीवनशैलीमध्ये बदल आणि डॉक्टरांच्या मदतीने रूग्ण बरा होऊ शकतो. भूक कमी होणे, वजन कमी होणे, पोटात वेदना होणे, अपचन आणि मळमळ होणे, उलटी होणे आणि सोबतच उलटीतून रक्त येणे, पोटात सूट येणे, विष्ठेतून रक्त येणे ही पोटाच्या कॅन्सरची सामन्य लक्षणे आहेत. मात्र, पोटाच्या कॅन्सर हा अनेक वर्षात हळूहळू वाढतो, त्यामुळे सुरुवातीला कोणतेही स्पष्ट लक्षण दिसत नाही. हा रोग तणाव, धुम्रपान आणि अल्कोहोल यामुळे वाढतो.

धुम्रपानामुळे तो आणखी बळावतो. आहारात फायबरचे प्रमाण कमी, अधिक मसालेदार आणि मांसाहारामुळे पोटात सूज येऊ शकते. याकडे दुर्लक्ष केल्यास कॅन्सर होऊ शकतो. जगभरात दरवर्षी गॅस्ट्रीक कॅन्सरचे साधारण ९ लाख ५२ हजार नवीन रूग्ण आढळतात. यापैकी सुमारे ७ लाख २३ हजार लोकांना जीव गमवाव लागतो. म्हणजे या आजाराने मृत्यू होण्याचा दर ७२ टक्के आहे. भारतात पोटाच्या कॅन्सरचे दरवर्षी सुमारे ६२ हजार रूग्ण आढळतात. तर मृत्यू होण्याचा दर ८० टक्के आहे.