Turmeric Side Effects | कोणत्या लोकांनी करावे हळदीचे कम सेवन, जाणून घ्या एका दिवसात किती प्रमाण योग्य

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Turmeric Side Effects | हळदीचे फायदे आपल्या सर्वांना माहीत आहेत. वजन कमी करणे (Weight Loss), त्वचेची काळजी घेणे (Skin Care) आणि इतर अनेक आरोग्य समस्यांमध्ये हळद खूप प्रभावी मानली जाते. आयुर्वेदात हळद ही एक विशेष वनस्पती मानली जाते. हळदीवर आपला इतका विश्वास आहे की आपण तिचा वापर आपल्या आयुष्याच्या अनेकदा करतो, मग ते गरम पाण्यासोबत असो किंवा फेस पॅक (Face Pack) म्हणून वापरणे असो किंवा संसर्ग टाळण्यासाठी हळदीची पेस्ट वापरणे असो. पण तुम्हाला माहित आहे का, एका दिवसात हळदीचा वापर किती प्रमाणात करावा? हळदीच्या जास्त वापरामुळे कोणते दुष्परिणाम होतात? (Turmeric Side Effects)

 

एका दिवसात किती हळद वापरावी
अनेक आरोग्य (Health) अहवालांनुसार, एखादी व्यक्ती एका दिवसात सुमारे 500 मिलीग्राम हळद खाऊ शकते, हे 1-3 ग्रॅमपर्यंत जाऊ शकते, परंतु जास्त प्रमाणात घेतल्यास दुष्परिणामांचा धोका वाढतो. एखादी व्यक्ती किती हळद खाऊ शकते हे त्या व्यक्तीच्या सध्याच्या आरोग्याच्या स्थितीवर अवलंबून असते. (Turmeric Side Effects)

 

हळदीचे साईड इफेक्ट

पोटदुखी (Stomach Ache)

अतिसार (Diarrhoea)

अ‍ॅसिड रिफ्लक्स (Acid Reflux)

चक्कर येणे (Dizziness)

डोकेदुखी (Headache)

किडनी स्टोन बनण्याचा धोका वाढू शकतो. (Kidney Stone)

मात्र, त्वचेवर हळद लावल्याने कोणतेही गंभीर दुष्परिणाम होत नाहीत. ज्या लोकांची त्वचा संवेदनशील असते त्यांच्या चेहर्‍यावर पुरळ होऊ शकते.

हळद कोणत्या लोकांसाठी हानिकारक?
ज्या लोकांना पित्ताशयाची समस्या, रक्तस्त्राव विकार, गॅस्ट्रोएसोफेजल रिफ्लक्स डिसऑर्डर आहे त्यांना हळद कमी प्रमाणात खाण्याचा सल्ला दिला जातो. मधुमेह असलेल्या लोकांनीही हळदीचे सेवन सावधगिरीने केले पाहिजे. कारण हळदीतील कर्क्युमिनचा साखरेच्या पातळीवर परिणाम होतो. आयर्नची कमतरता असलेल्या लोकांनी हळद खाणे टाळावे. कारण हळद आयर्नचे शोषण सुमारे 20% कमी करते.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Turmeric Side Effects | turmeric side effects in marathi how much turmeric can use in a day

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Cholesterol | ‘या’ हिरव्या भाजीपासून तयार करा स्पेशल Herbal Tea, हाय कोलेस्ट्रॉलपासून होईल सुटका

’गंदी बात’ फेम Gehana Vasisth ने बाथरूममध्ये दिल्या न्यूड पोज, का म्हटले – ’…थकले आता’

Edible Oil Price | मोदी सरकारच्या बैठकीनंतर निर्णय, खाद्यतेल होईल इतके स्वस्त!