Tushar Gandhi Slams Kangana Ranaut | ‘दुसरा गाल पुढे करायला हिंमत लागते’; तुषार गांधींनी कंगनाला सुनावले

पोलीसनामा ऑनलाईन टीम : Tushar Gandhi Slams Kangana Ranaut | बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) हि नेहमी काहीनाकाही वादग्रस्त वक्तव्य करत असते. अलीकडेच तिला भारत सरकारकडून पद्मश्री पुरस्कार देण्यात आला होता. यानंतर तिने एका मुलाखतीत 1947 साली मिळालेले स्वातंत्र्य भीक होते. खरे स्वातंत्र्य तर 2014 साली मिळाले असे वक्तव्य केले त्यामुळे राज्यात नव्या वादाला तोंड फुटले. तिच्या या वक्तव्यावर देशभरातून टीका झाल्यावरदेखील ती गप्प बसली नाही तर तिने थेट राष्ट्रपिता महात्मा गांधींवर (Father of the Nation Mahatma Gandhi) निशाणा साधला. कंगनाने महात्मा गांधी आणि नेताजी सुभाषचंद्र बोस (Netaji Subhash Chandra Bose) यांच्या संदर्भात केलेल्या विधानांवरून आणखी एक वाद उफाळला. यानंतर संपूर्ण देशभरातून तिच्यावर संताप व्यक्त करण्यात येत आहे. कंगनाच्या या वादग्रस्त वक्तव्यावरुन सुभाषचंद्र बोस यांची कन्या अनिता बोस (Anita Bose) यांनी कंगनाला चांगलेच फटकारले आहे. यानंतर आता महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी (Tushar Gandhi) यांनी देखील कंगनाचा चांगलाच समाचार (Tushar Gandhi Slams Kangana Ranaut) घेतला.

 

कंगना काय म्हणाली होती ?
ज्यांनी स्वातंत्र्यासाठी लढा दिला, त्यांना सत्तेच्या भुकेल्या आणि धूर्त लोकांनी त्यांच्या मालकांच्या स्वाधीन केले होते. हे ते लोक होते ज्यांनी त्यांचे शोषण केले. यांच्यात लढण्याची हिंमत नव्हती किंवा त्यांचे रक्तही उसळले नाही. हेच लोक आम्हाला शिकवतात, जर तुम्हाला कोणी थप्पड मारली तर दुसर्‍या गालावर दुसरी थप्पड खा आणि अशा प्रकारे तुम्हाला स्वातंत्र्य मिळेल. पण कोणालाही असे स्वातंत्र्य मिळत नाही. अशा प्रकारे फक्त भीक मिळते. म्हणून आपले आदर्श हुशारीने निवडा, असे कंगनाने इंस्टाग्रामवर स्टोरी पोस्ट करत म्हटले होते. तिच्या या पोस्टवर तुषार गांधी (Tushar Gandhi) यांनी पलटवार करत चांगलाच समाचार घेतला आहे.

तुषार गांधी काय म्हणाले ?
अभिनेत्री कंगना रानौतला गांधीजींचे पणतू तुषार गांधी यांनी उत्तर देताना गांधींचा तिरस्कार करणाऱ्यांपेक्षा दुसरा गाल पुढे करण्यासाठी जास्त धाडस लागतं असं शिर्षक देत त्यांनी एक लेख लिहिला आहे. जे लोक आरोप करतात की गांधीवादी फक्त दुसरा गाल पुढे करतात कारण ते घाबरतात. खरंतर हे धाडस करण्यासाठी आवश्यक असलेल्या हिंमतीला ते समजू शकत नाहीत. ते अशा प्रकारचे शौर्य समजून घेण्यास समर्थ नाहीत. दुसरा गाल पुढे करणं हे घाबरण्याचं लक्षण नाही. यासाठी खूप धाडस लागत. त्यावेळी भारतीयांनी मोठ्या प्रमाणावर ते दाखवलं होतं ते सर्वजण हिरो होते, तर भित्रट लोक आपल्या डोळ्यांची पापणीही न हालवता वैयक्तिक फायद्यासाठी दयेसाठी याचना करत होते. घाबरट ते होते ज्यांनी स्वार्थासाठी दया आणि क्षमा याचना करताना एकदाही मागेपुढे पाहिलं नाही. (Tushar Gandhi Slams Kangana Ranaut)

 

पुढे, तुम्ही खोटे कितीही जोरात ओरडून सांगितले आणि सत्याचा आवाज कितीही छोटा वाटत असला तरी तेच टिकते.
खोटे जिवंत ठेवण्यासाठी एकामागोमाग अनेक खोटे सांगावे लागते. सध्याच्या घडीला काही खोट्या गोष्टी ओरडून सांगितल्या जात आहेत,
ज्यांना उत्तर देणे गरजेचे आहे. बापू भिकारी म्हणून शिक्का मारल्याचे स्वागत करतील.
आपल्या देशासाठी, लोकांसाठी त्यांची भीक मागायला हरकत नव्हती.
ब्रिटीश पंतप्रधानांनी अर्धनग्न फकीर म्हणून हिणवल्याचेही त्यांनी कौतुक केले होते.
पण शेवटी याच फकिरासमोर ब्रिटीश राजवट अखेर शरण आले होते असे तुषार गांधी यांनी आपल्या लेखात म्हंटले आहे.
१९४७ ला भारताला मिळालेलं स्वातंत्र्य भीक होती या कंगनाच्या वक्तव्यावर हा हजारो स्वातंत्र्यसैनिकांच्या शौर्याचा आणि बलिदानाचा अपमान आहे असे तुषार गांधी (Tushar Gandhi) म्हणाले.

Web Title :- Tushar Gandhi Slams Kangana Ranaut | tushar gandhi slams kangana ranaut over Father of the Nation mahatma gandhi statement

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

IND Vs NZ | 2 देश, 2 अर्धशतकं आणि एकसारखा स्कोअर ! न्यूझीलंडच्या ‘या’ खेळाडूने केला अनोखा रेकॉर्ड

Chhagan Bhujbal | SPPU मध्ये लवकरच सावित्रीबाईंचा पुतळा – छगन भुजबळ (व्हिडिओ)

Crime News | धक्कादायक ! प्रियकराच्या लग्नात प्रेयसीनं केलं डायरेक्ट ‘हे’ कृत्य; धक्का सहन न झाल्याने नवरीच्या मामाचा मृत्यू