Kolhapur News : चितळे, जेऊर परिसरात हत्तीचा धुमाकूळ; पिकांचे नुकसान

कोल्हापूर  : पोलीसनामा ऑनलाइन –   कोल्हापूर येथील आजरा तालुक्यातील जेऊर-चितळे परिसरात(Jeur Chitale area) (टस्कर) हत्तीने धुमाकूळ घातला आहे. रखवालीसाठी गेलेल्या नागरिकांना रस्ता ओलांडताना हत्ती त्या परिसरात हत्ती दिसून आला. त्या हत्तीने रात्रीच्या वेळी चितळे, जेऊर गावाजवळील आसपास मोठ्याने चित्कारल्याने जेऊर चितळे परिसरातील(Jeur Chitale area)  नागरिकामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

हत्तीने ऊस, केळी, नारळ अशा पिकांचे नुकसान केले आहे. या तालुक्यातील मसोली, वेळवट्टी, देवर्डे परिसरात धुमाकूळ घालत असलेला (टस्कर) हत्ती गेल्या आठ ते दहा दिवसापुर्वी चितळे परिसराकडे गेला होता. चितळे, भावेवाडी, जेऊर परिसरात टस्करने दहशत पसरविल्याने नागरिक भितीच्या छायेखाली आहेत. त्रिभुवने फार्महाऊस मधील ऊसासह पाण्याची टाकी फोडून अन्य पिकांचेही नुकसान हत्तीने केले आहे.

नेमिनाथ त्रिभुवने, विजय त्रिभुवने, शशिकांत त्रिभुवने, सचिन सरदेसाई यांच्या ऊस, केळींचे हत्तीने प्रचंड नुकसान केले आहे. शामराव गुडूळकर यांचा पावरट्रिलर उचलून टाकल्याने त्यांचेही नुकसान झाले आहे. हत्ती आता नागरी वस्तीजवळच्या परिसरात आला आहे. त्यामुळे तेथील नागरिकांमध्ये भितीयुक्त वातावरण पसरले आहे. ह्या प्रकरणावरून वनविभागाच्या पथकाकडून रात्रीच्यावेळी हत्तीला हुसकावून लावण्यासाठी गस्त घातली जात आहे.