Tuzyat Jiv Rangla | ‘तुझ्यात जीव रंगला’ फेम कल्याणी कुरळेचा रस्ते अपघातात मृत्यू

पोलीसनामा ऑनलाईन टीम – मनोरंजन सृष्टीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ‘तुझ्यात जीव रंगला’ (Tuzyat Jiv Rangla) या लोकप्रिय मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री कल्याणी कुरळे-जाधव (Kalyani Kurale Jadhav) हिचा रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. कोल्हापूरमधील (Kolhapur) हालोंडी सांगली फाटा याठिकाणी एका डंपरने दिलेल्या धडकेत कल्याणीला आपला जीव गमवावा लागला आहे. कल्याणीच्या मृत्यूनंतर मराठी सिनेसृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे.

 

काय घडले नेमके?
कल्याणी कुरळे हिने काही दिवसांपूर्वी कोल्हापूर सांगली महामार्गावरील हालोंडी सांगली फाटा (Halondi Sangli Fata) या ठिकाणी एक हॉटेल सुरु केले होते. प्रेमाची भाकरी (Premachi Bhakri) असे या हॉटेलचे नाव होते. हे हॉटेल बंद करुन बाहेर पडत असताना भरधाव वेगाने आलेल्या डंपरने तिला जोरदार धडक दिली. हि धडक एवढी भीषण होती कि या धडकेत तिचा जागीच मृत्यू झाला.

 

आठवडाभरापूर्वीच साजरा केला होता वाढदिवस
आठवडाभरापूर्वीच कल्याणीने वाढदिवस साजरा केला होता. यानिमित्त तिने सोशल मीडियावर चाहत्यांसोबत एक व्हिडीओ शेअर केला होता. ‘काल माझा वाढदिवस मी लोकांना प्रेमाची भाकरी करून खायला देण्यात घालवला. मला खूप आनंद झाला. मी माझा वाढदिवस साजरा करण्यासाठी कुठे बाहेर गेले नाही, ना पार्टी केली. मी माझ्या वाढदिवसानिमित्त लोकांना प्रेमाची भाकरी करून खायला घातली हे फक्त स्वामींनी माझ्याकडून करून घेतलं आहे. असंच प्रत्येक वाढदिवसाला होऊ दे. स्वामी मला तुमचे आशीर्वाद तर आहेतच असेच आशीर्वाद नेहमी असुदेत. मला हे सगळं करण्यासाठी शक्ती द्या,’ अशी पोस्ट तिने लिहिली होती. त्याचसोबत भाकरी थापतानाचा व्हिडीओ शेअर केला होता.

 

कल्याणी कुरळेची कारकीर्द
कल्याणी ही मूळची कोल्हापूरची आहे. ती महावीर कॉलेज (Mahavir College) परिसरात वास्तव्यास होती. ती छोट्या पडद्यावरुन प्रसिद्धीझोतात आली. तिने झी मराठी वाहिनीवरील तुझ्यात जीव रंगला या मालिकेत सहाय्यक व्यक्तिरेखेची भूमिका साकारली होती. यामुळे तिला मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळाली होती. या मालिकेबरोबरच तिने सन मराठी (Sun Marathi) या वाहिनीवरील दख्खनचा राजा ज्योतिबा (Dakkhancha Raja Jyotiba) या मालिकेतही काम केले होते. तिची या मालिकेतील भूमिकादेखील मोठ्या प्रमाणात गाजली होती.

 

Web Title :- Tuzyat Jiv Rangla | tujhyat jeev rangala fame marathi actress kalyani kurale jadhav passed away

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Apurva Nemlekar | ‘त्या’ प्रश्नावर चाहत्याला अपूर्वा नेमळेकरचे सडेतोड उत्तर; नक्की काय म्हणाली अपूर्वा नेमळेकर…

Sania and Shoaib Divorce | शोएब आणि सानियाच्या घटस्फोटाची चर्चा पण दोघांनी केली ‘ही’ घोषणा

Gopichand Padalkar | गोपीचंद पडळकरांचे उपमुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, म्हणाले – ‘…तर बहुजन विद्यार्थ्यांचे नुकसान होईल’