TV AC Mobile Price Hike | 1 एप्रिलपासून ग्राहकांवर महागाईचा भार ! टीव्ही, एसी, Mobile महागणार; तर CNG वाहनधारकांना दिलासा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – TV AC Mobile Price Hike | 1 एप्रिल नवीन आर्थिक वर्षापासून (2022 – 2023) होणा-या बदलानंतर ग्राहकांवर महागाईचा भार पडणार आहे. याचा परिणाम काही वस्तु वाढणार (TV AC Mobile Price Hike) आहे. नुकत्यांच झालेल्या अर्थसंकल्पात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी आयात शुल्कात बदल केले होते. त्यामुळे टीव्ही (TV), फ्रिज (Fridge), एसी (AC) यासह मोबाईल घेणं महागणार आहे.

 

या वस्तुबरोबरच ज्या कच्च्या मालावर उत्पादन शुल्क वाढवण्यात आलेत, ती उत्पादनेही महागणार आहेत. तसेच, दुसरीकडे एक दिलासा देणारीही माहिती समोर आली आहे. अर्थातच कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस (CNG) च्या किंमती सहा रुपये प्रति किलोने घसरल्या आहेत. म्हणून वाहनधारकांना आता 1 एप्रिलपासून 60 रुपये प्रतिकिलो दरानं गॅस भरता येणार आहे. दरम्यान यापूर्वी हा भाव 66 रुपये प्रती किलो होता. (TV AC Mobile Price Hike)

राज्य सरकारच्या (Maharashtra Government) निर्णयानंतर संपूर्ण राज्यात सीएनजी (CNG) इंधन स्वस्त झाले आहे. वित्त विभागाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार राज्यात 1 एप्रिलपासून सीएनजी स्वस्त होणार आहे. सीएनजीवरील व्हॅट 13.5 टक्क्यांवरून 3 टक्क्यांपर्यंत कमी करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला. त्यामुळे ऑटो – रिक्षा, टॅक्सी चालक, प्रवासी वाहने, नागरिकांना एक दिलासा मिळाला आहे.

 

दरम्यान, सरकारकडून ॲल्युमिनियमवर 30 टक्के आयात शुल्क लावल्याने याचा वापर टीव्ही, एसी आणि फ्रिजचे हार्डवेअर बनवण्यासाठी होतो.
कच्च्या मालाचा पुरवठा महागल्याने कंपन्या उत्पादनाचे दर वाढणार आहेत.
त्यामुळे महागाईचा फटका ग्राहकांना बसणार आहे.
तसेच, कॉम्प्रेसरमध्ये वापरण्यात येणाऱ्या पार्ट्सवर आयात शुल्क वाढवण्यात आले.
ज्यामुळं फ्रिज घेणे महागणार आहे.
सरकारनं एलईडी बल्ब तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या साहित्यावर मूळ सीमा शुल्कासह 6 टक्के प्रतिपूर्ती शुल्क आकारला जाणार आहे.

 

Web Title :- TV AC Mobile Price Hike | in the new financial year tv ac mobile will be more expensive while cng vehicle owners will be relieved

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा