TV Actor Death | धक्कादायक ! प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याचा संशयास्पद मृत्यू, ‘या’ अवस्थेत मृतदेह आढळल्यानं प्रचंड खळबळ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन TV Actor Ramesh Waliasala Death |मनोरंजनसृष्टीत एकापाठोपाठ एक दु:खद घटना घडत आहेत. प्रसिद्ध मल्याळम अभिनेता (Malayalam actor) रमेश वलियासाला (Ramesh Waliasala) यांचे निधन झाले आहे. दुर्दैवी बाब म्हणजे रमेश वालियासाला यांचा मृतदेह (TV Actor Ramesh Waliasala Death) त्यांच्या घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. पोलिसांनी या प्रकरणाची अनैसर्गिक मृत्यूची नोंद करुन तपास सुरु केला आहे.

केरळचे रमेश वलियासाला हे एक प्रसिद्ध मल्याळम टीव्ही अभिनेता आहेत.
रमेश यांनी अनेक मालिकांमधून अभिनय केला आहे. त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे.
याशिवाय त्यांनी चित्रपटांमधून देखील काम केले आहे. दोन दिवसांपूर्वीच रमेश हे शूटिंगवरुन घरी परतले होते.

रमेश वलियासाला हे गेली 22 वर्षे मल्याळम अभिनय क्षेत्रात कार्यरत होते.
ते सर्वात व्यग्र सहाय्यक अभिनेत्यांपैकी (supporting actor) एक होते.
त्यांनी अनेक मालिकांमध्ये लक्षवेधी काम केलं आहे. त्यांचा मोठा चाहतावर्ग होता.
रमेश यांनी महाविद्यालयीन काळापासून अभिनय करण्यास सुरुवात केली होती.

रमेश वलियासाला यांचा अशा प्रकारे संशयास्पद मृत्यूने सर्वांनाच धक्का बसला आहे.
पोलिसांनी पुढील तपास सुरु केला आहे. अभिनेत्याच्या मृत्यूची माहिती सर्वप्रथम निर्माता आणि प्रोडक्शन कंट्रोलर एन.एम बदूशा (N. M. Badusha) यांनी सोशल मीडियावरुन दिली होती.

 

Web Title : TV Actor Death | shocking famous tv actor ramesh waliasala myestris death today read in marathi

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 287 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

Murder In Nagpur | पोलीस ठाण्यात मोर्चा जाताच उलगडलं खूनाचं रहस्य, दोन जणांना केली अटक

Gujarat CM | गुजरातचे नवे ‘CM’ कोण?, चंद्रकांत पाटील की नितीन पटेल? चर्चेला उधाण