TV Actor Gaurav Dixit | ड्रग्ज प्रकरणात टीव्ही अभिनेता गौरव दीक्षितला अटक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन TV Actor Gaurav Dixit | नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (narcotics control bureau) अर्थात एनसीबीने (NCB) मार्चमध्ये ड्रग्ज प्रकरणात अजाज खानला अटक केली होती. त्याच्या माहितीवरून ड्रग पेडलर शादाब बटाटा (drug peddler shadab batata) याला अटक केल्यानंतर अभिनेता एजाज खान (actor ajaz khan) याचं नाव समोर आलं होतं. एवढंच नाही तर मुंबईतील बॉलिवूड सेलिब्रिटींना ड्रग्स पुरवल्याचे तपासात समोर आले. त्यानंतर एनसीबीने एप्रिलमध्ये ड्रग्ज प्रकरणी टेलिव्हिजन अभिनेता गौरव दीक्षित (TV Actor Gaurav Dixit) याच्या मुंबईतील लोखंडवाला येथील निवासस्थानी छापा टाकला. त्यामध्ये अंमली पदार्थ सापडले होते. पण तो मिळून आला नाही. एनसीबी अनेक दिवस दीक्षित याच्या शोधात होते अखेर शुक्रवारी गौरव दीक्षितला मुंबईतील घरातून अटक करण्यात आली.

यावेळी एमडी ड्रग्स, चरस आणि इतर ड्रग्स जप्त करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
अभिनेता एजाज खानच्या आधारे गौरववला अटक करण्यात आली आहे.
मुंबईतील सर्वात मोठा ड्रग्ज सप्लायर फारुख बटाटा याचा मुलगा शादाब बटाटा आहे.
एनसीबीने शादाबला जेव्हा अटक केली त्यावेळी सुमारे दोन कोटींचे ड्रग्ज जप्त केले होते.

 

फारुख सुरुवातीला बटाटे विकायचा. त्यानंतर तो अंडरवर्ल्डच्या काही लोकांच्या संपर्कात आला आणि मुंबईतील सर्वात मोठा ड्रग्स सप्लायर झाला.
सध्या हे काम त्याच्या दोन्ही मुले सांभाळतात असे समजत आहे.
यासंदर्भात बोलताना एनसीबीचे अधिकारी म्हणाले की, गौरवला आम्ही अनेक दिवसांपासून शोधत होतो. यापूर्वीही त्याला पकडण्याचा प्रयत्न केला पण ते शक्य झाले नाही मात्र शुक्रवारी त्याला अटक करण्यात आली असून त्याला कोठडी मिळवण्यासाठी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

 

Web Title : TV Actor Gaurav Dixit | television actor gaurav dixit arrested by narcotics control bureau in drug case mumbai house,

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Crime | भाजपचा माजी नगरसेवक विवेक यादव याच्यावर आणखी एक गुन्हा दाखल; जाणून घ्या प्रकरण

e-SHRAM Card | आवश्य बनवा आपले ई-श्रम कार्ड, फ्री मिळेल 2 लाखाची ‘ही’ सुविधा, जाणून घ्या रजिस्ट्रेशनची प्रक्रिया

Pune Crime | घटस्फोटित पत्नीवर चाकूने वार करुन केला जीवे मारण्याचा प्रयत्न; पुण्याच्या वडगाव शेरी येथील घटना

ONGC | भारतीय बनावटीची अत्याधुनिक ड्रिलिंग रिग ओएनजीसीकडे सुपूर्द