‘भावाच्या X गर्लफ्रेंडनेच जादूटोण्याने आम्हाला ‘बरबाद’ केलं’, ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याच्या बहिणीचा आरोप

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – टीव्ही अभिनेता करण ओबेरॉय रिलेशनशिपमुळे गेल्या महिन्यात चर्चेत होता. त्याच्या गर्लफ्रेंडने त्याच्यावर लैंगिक शोषण आणि रेपचा आरोप केला होता. त्याला जेलही झाली होती. नंतर यातून तो बरी झाला होता. परंतु ही केस दीर्घकाळ सुरु होती. पुन्हा एकदा प्रेयसीमुळे तो चर्चेत आला आहे. करणच्या बहिणीने आता त्याच्या एक्स गर्लफ्रेंडवर अनेक आरोप केले आहेत.

एका रिपोर्टनुसार, करण ओबेरॉयची बहिण गुरबानी ओबेरॉय आपल्या भावाच्या एक्स गर्लफ्रेंडविरोधात मुंबईच्या अंधेरी मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट कोर्टात गेली आहे. तिचा आरोप आहे की, भावाची एक्स गर्लफ्रेंड जादू टोना शिकते आणि करतेही. तिच्या या जादूटोन्यामुळेच तिच्या आईवडिलांना त्रास सहन करावा लागला आहे. आताही ते या त्रासाला सामोरे जात आहेत.

वृत्तपत्राशी बोलताना गुरबानी म्हणाली, “तिचं जादूटोना करणं हे काही नवीन नाही. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये झालेल्या तक्रार पत्रात याचा उल्लेख केला होता. यानंतर तिने 7 महिन्यांनी माझ्या भावाविरोधात केस दाखल केली होती.”

पुढे गुरबानी म्हणाली की, “ती नेहमीच धमक्या देत असे की, आमचं वाईट करेल. तिने असंही म्हटलं होतं की, जादूटोन्याने माझ्या आईवडिलांची अवस्था खराब करेल. तिने दावा केला होता की, तिच्या जादूटोन्यानेच माझे आईवडिल परेशान आहेत. पुढे आणखी परेशान होतील. तिच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे.”

करण ओबेरॉयचा बहिणीला पाठिंबा
करणनेही आपल्या बहिणीला सपोर्ट करत त्याला झालेल्या त्रासाबद्दल सांगितले. तो म्हणाला की, “मी अनेक दिवसांपासून हे सांगितले आहे. मी माझ्या तक्रारीत तिच्या जादूटोन्याबाबत सांगितले होते. महाराष्ट्रात जादूटोना गंभीर अपराध असूनही तिच्याविरोधात कोणतीच कारवाई झाली नाही.”

करणचे डिफेंसवाले वकिल दिनेश तिवारी म्हणाले की, “महाराष्ट्रात जादूटोन्याबाबत बोलणं आणि त्याचा प्रचार करणंही अपराधाच्या श्रेणीतच येतं. जर कोणी यावर पुस्तक लिहिलं तर तो मोठा अपराध मानला जातो. जर कोणी व्यक्ती किंवा समूह कोणाला जादूटोना शिकवत असेल तर त्याच्यावर कारवाई केली जाते. खास बात अशी की, जादूटोन्याची बाब मुलीच्या वकिलाने मान्य केली आहे. तिच्याविरोधात कारवाई करण्यासाठी यापेक्षा मोठा पुरावा काय असू शकतो.”

आरोग्यविषयक वृत्त –

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like