‘या’ अभिनेत्याच लग्न होत, त्याच दिवशी वडिलांचं झालं होतं निधन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – टीव्ही अभिनेता क्रिप कपूर सुरी सध्या चर्चेत आहे. याला कारणही तसेच आहे त म्हणजे त्याची आगामी मालिका ज्याचे नाव आहे विष. या मालिकेत नकारात्मक भूमिका साकारणारा क्रिप सध्या ट्रेंड होत असल्याचे समजत आहे. क्रिपच्या वैवाहिक जीवनात सारं काही आलबेल नाही. क्रिप आणि त्याची पत्नी घटस्फोट घेणार आहेत अशी चर्चा सोशलवर रंगताना दिसली. यावर क्रिपने भाष्य करत त्याबाबत खुलासा केला आहे. त्याच्या आयुष्यात सार काही सुरळीत असून त्याचं वैवाहिक जीवन सुखी चालू आहे असे क्रिप म्हणाला आहे.

एका मुलाखतीत क्रिप म्हणाला की, “६ सप्टेंबर २०१४ मध्ये माझं लग्न झालं होतं. परंतु दु:खद बाब अशी की, त्याच दिवशी माझ्या वडिलांचा मृत्यू झाला. त्यामुळे मी माझ्या पत्नीला फक्त सिंदूर लावूनच घरी आणलं होतं. यानंतर अनेकांनी तिला टार्गेट करत तिच्याबद्दल अनेक वाईट गोष्टी बोलायला सुरुवात केली होती. माझ्यासाठी ती अशुभ आहे असेही अनेकांनी म्हटलं होतं.”

पत्नीची बाजू घेत क्रीप म्हणाला की, “सिमरनला दोष देण्यापूर्वी लोकांना हे कळलं पाहिजे की, माझ्या करिअरमधला पहिला ब्रेक मला लग्नानंतरच मिळाला होता. सिमरन माझ्यासाठी लकी ठरली आहे. तिने माझी साथ कधीच सोडली नाही. माझं तिच्यावर खूप प्रेम आहे.”

https://www.instagram.com/p/ByOGEwyggxF/?utm_source=ig_embed

यामुळे चर्चेत आहेत क्रिप-सिमरन

असेही म्हटले जात आहे की, क्रिप त्याच्या कोस्टारसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. तर सिमरनदेखील तिच्या ऑफिसमधील एका व्यक्तीला डेट करत आहे. याबाबतही क्रीपने स्पष्टीकरण दिले आहे. क्रिप म्हणाला की, “जर तुम्ही एखाद्यासोबत ऑनस्क्रीन चांगले दिसत असाल तर याचा अर्थ असा नाही की, खऱ्या आयुष्यातही तुम्ही त्यांच्यासोबत नात्यात आहात.” क्रिप आणि सिमरन सोशलवर नेहमीच सक्रिय असतात. त्यांच्या अफेअरच्या चर्चेमुळे ते दोघे चर्चेत आले आहेत.

सिनेजगत

#Video : म्हणून रस्त्यावर चालत होती जान्हवी कपूर, पाहून चाहते झाले चकित…

सिंगर नेहा भसीनने शेअर केले तिचे ‘हॉट’ फोटो अन् पहाता-पहाता सोशलवर धुमाकूळ

हे काय, अरबाज आणि मलायका पुन्हा ‘एकत्र’ ?

ती माझ्या पती’सोबत’ होती, तिला मुलगी कशी म्हणू ; आदित्य पांचोलीच्या पत्नीचा कंगनावर ‘निशाणा’

 

Loading...
You might also like