‘बिग बॉस’ फेम देवोविना भट्टाचार्जी विरोधात सायबर क्राईमची तक्रार दाखल ! जाणून घ्या नेमकं प्रकरण काय

पोलीसनामा ऑनलाइन – टीव्ही अ‍ॅक्ट्रेस आणि बिग बॉस 13 ची स्पर्धक देवोलिना भट्टाचार्जी हिच्या विरोधात सायबर क्राईमची तक्रार दाखल करण्यात आली आहे. मुझसे शादी करोगे या रिअ‍ॅलिटी शोमधील स्पर्धक मयुर वर्मा यानं ही तक्रार दाखल केली असून त्यानं ट्विटरवरून याबाबत माहिती दिली आहे. देवोलिनानं त्याची प्रतिमा खराब करण्याचा आणि त्याला अपमानित करण्यचा प्रयत्न केला असा आरोप मयुरनं केला आहे.

काही दिवसांपूर्वीच सिद्धार्थ शुक्ला आणि शहनाज गिल यांचं भूला दूंगा हे गाणं रिलीज झालं होते. तेव्हा देवोलिनानं या गाण्याची खिल्ली उडवली होती. यानंतर या सोशल वॉरला सुरुवात झाली होती. मयुर आणि देवोलिना यांच्यात वाद झाले होते. यानंतरच मयुरनं देवोलिनाविरोधात तक्रार दाखल केली होती.

मयुरनं केलेल्या तक्रारीचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. फोटो शेअर करताना तो म्हणतो, काही गोष्टी मर्यादेच्या बाहेर गेल्या आहेत. म्हणून मला आता सायबर क्राईमची मदत घ्यावी लागत आहे. मला विश्वास आहे की, ते लवकरच या प्रकरणी कारवाई करतील.

देवोलिनानं यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. हा पब्लिसिटी स्टंट असल्याचं म्हणत देवोलिना म्हणते, “मी कोणत्याही मयुर वर्माला ओळखत नाही. तो माझं नाव का घेत आहे हे मला माहिती नाही. हा एक पब्लिसिटी स्टंट असू शकतो. अशा गोष्टींकडे मी जास्त लक्ष देत नाही. मला त्याची तक्रारही माहित नाही.”