पत्नीच्या ‘या’ गोष्टीला खूपच वैतागला अभिनेता, व्हिडीओ शेअर करत म्हणाला – ‘मला माझ्या बायकोपासून वाचवा’ !

पोलीसनामा ऑनलाइन – अभिनेता राम कपूर आपल्या एका व्हिडीओमुळं चर्चेत आला आहे. खास बात अशी की, त्याची पत्नी गौतमी कपूर हीदेखील आहे. व्हिडीओत असं काही होत आहे की, राम कपूर पत्नीपासून मला कोणी वाचवा अशी हाक देताना दिसत आहे.

रामनं त्याच्या इंस्टावरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात त्याची पत्नी गौतमी कपूर दिसत आहे जी मस्तीच्या मूडमध्ये आहे. व्हिडीओत दिसत आहे की, गौतमी रवीना टंडन आणि सुनील शेट्टी यांचं शहरी की लडकी हे गाणं गात आहे. शेजारी असलेला राम तिचा व्हिडीओ तयार करत आहे. हे लक्षात आल्यानंतर मात्र गौतमी कॅमरा बंद करायला सांगते. यावर राम म्हणतो, दुनियेला कळू दे मी काय काय झेलतो ते.हे ऐकूण गौतमी खपू हसते आणि पुन्हा तिचं तोंड लपवते.

View this post on Instagram

MUJHE MERI BIWI SE BACHAO !!!!!

A post shared by Ram Kapoor (@iamramkapoor) on

व्हिडीओ शेअर करताना रामनं खास कॅप्शनही दिलं आहे. राम म्हणतो, “मला माझ्या बायकोपासून वाचवा.”

राम आणि गौतमी यांचा हा मस्ती करतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. खास बात अशी की, हा व्हिडीओ चाहत्यांनाही खूप आवडला आहे. अनेकांनी यावर कमेंट करत प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत.

View this post on Instagram

Wasssssup peeps ?? Long time no see

A post shared by Ram Kapoor (@iamramkapoor) on

रामच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच तो झी 5 वरील सायकॉलॉजिकल थ्रिलरमध्ये दिसणार आहे. यात त्याचा वेगळाच अवतार पाहायला मिळणार आहे. कारण तो एक भयानक विलन साकारणार आहे. रामनं हमशकल्स, मेरे डॅड की मारूती, मान्सून वेडिंग आणि स्टुडेंट ऑफ द ईयर यांसारख्या सिनेमात काम केलं आहे.

View this post on Instagram

After my morning coffee !!!

A post shared by Ram Kapoor (@iamramkapoor) on