प्रसिद्ध अभिनेता सलील अंकोला यांना ‘कोरोना’; ‘अशी’ झालीये परिस्थिती, फोटो व्हायरल

नवी दिल्ली : देशभरात कोरोना व्हायरसचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. रुग्णांची संख्याही वाढली आहे. त्यातच बॉलिवडूसह टीव्ही अभिनेते-अभिनेत्रींनाही कोरोनाने विळखा घातला आहे. त्यानंतर आता प्रसिद्ध क्रिकेटर आणि छोट्या पडद्यावरील अभिनेता सलील अंकोला यांना कोरोना व्हायरसचा संसर्ग झाला आहे. सध्या त्यांच्या प्रकृतीविषयीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

 

कोरोना व्हायरसचा संसर्ग होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यात सलील अंकोला यांना कोरोनाची लागण झाली आहे. सलील यांचा आज (ता.1) मार्चला वाढदिवस आहे. मात्र, वाढदिवशीच त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समजल्यानंतर त्यांचे चाहतेही नाराज झाले आहेत. कोरोना झाला असल्याची माहिती सलील यांनी स्वत: दिली आहे. त्यांनी रुग्णालयात दाखल झाल्याचे फोटो सोशल मीडियावर टाकले आहेत.

सलील अंकोला यांनी त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून फोटो शेअर केले आहेत. त्यामध्ये ते रुग्णालयातील बेडवर झोपल्याचे दिसत आहेत. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले, की ‘उद्या (ता.1) माझ्या जन्मदिवशीच कोरोना व्हायरसने विळख्यात ओढले आहे. हा माझा वाढदिवस कधीही न विसरता येणारा आहे. या आजारातून जाणे हे भीतीदायक आहे. मात्र, त्यासाठी मला तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची गरज आहे, मी लवकरच परतेन.