Casting Couch : ‘काम हवं असेल तर माझ्याबरोबर झोप’, अंकिता लोखंडेचा खळबळजनक गौप्यस्फोट

मुंबईः पोलीसनामा ऑनलाईन – अनेक अभिनेत्रींनी आजवर कास्टिंग काउचवर भाष्य केले आहे. कास्टिंग काऊच हा विषय इंडस्ट्रीसाठी नवा नाही. MeToo मोहिमेअंतर्गतही यावर आवाज उठविण्याचा प्रयत्न झाला. त्यानंतर आता इंडस्ट्रीतील नावाजलेली अभिनेत्री अंकिता लोखंडे हीने देखील एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आपल्यालाही कास्टिंग काउचचा सामना करावा लागल्याचा खुलासा केला आहे. एका चित्रपट निर्मात्याने आपल्याशी गलिच्छ व्यवहार केल्याचे स्पष्ट केले आहे.

अभिनेत्री अंकिता लोखंडे हिने सांगितले की, मी फार लहान होते त्यावेळी एका दाक्षिणात्य चित्रपटाच्या ऑडिशनसाठी मला बोलावण्यात आले होते. त्याठिकाणी एका माणसाने मला खोलीत बोलावून तुला कॉम्प्रमाइज कराव लागेल, तू तयार आहेस ना असे विचारले होते. त्यावेळी साधारणत: 19-20 वर्षांची होते. त्याने मला ज्या खोलीत बोलावले तिथे कोणीही नव्हते. तेंव्हा मीही मुद्दाम विचारल सांगा कोणत कॉम्प्रमाइज करावे लागेल. मला डिनर पार्टीला जाव लागेल? प्रोडुसर्स ना काय वाटतं? मी लहान असले तरी त्यांची चांगलीच शाळा घेतल्याचे अंकिता म्हणाली. तुम्हाला चांगली हुशार अभिनेत्री नको तर झोपण्यासाठी मुलगी पाहिजे? असा सवाल आपण केला. त्यानंतर त्यांनी माझी माफी मागितली आणि आम्ही तुला काम द्यायला तयार असल्याचे सांगितले. पण मी त्यांना साफ नकार दिल्याचे अंकिताने सांगितले. तसेच चित्रपटसृष्टीतील एका प्रसिध्द अभिनेत्याने गैरवर्तन केल्याचा गौप्यस्फोटही अंकिताने या मुलाखतीत केला. पण आपल्याला कोणाचेही नाव घ्यायचे नसल्याचे तिने म्हटले आहे.