एकाच सिनेमात झळकलेल्या या अभिनेत्रीने घेतला चक्क 8 BHK FLAT

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मणिकर्णिका द क्वीन ऑफ झांसी या सिनेमात झळकलेल्या अंकिता लोखंडे हिने नुकताच एक भव्य दिव्य प्लॅट खेरदी केला आहे. तिचा प्रियकर विकी जैनसोबत मिळून अंकिताने हा भव्य दिव्य फ्लॅठ खरेदी केला आहे. मणिकर्णिका मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या अंकिताने या सिनेमात झलकारी बाई ही भूमिका साकारली आहे. सध्या तिने खरेदी केलेल्या फ्लॅटची सगळीकडे चर्चा होताना दिसत आहे.

एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, अंकिता आणि विकीने मिळून चक्क 8 बीएचके फ्लॅट खरेदी केला आहे. दोघांनी मिळून घेतलेला हा फ्लॅट सध्या अंडर कंस्ट्रक्शन आहे. असे समजत आहे की, अंकिताची आता सेटल होण्याची इच्छा आहे. तिला लग्न करायचे आहे. अंकिता आणि तिचा प्रियकर विकी येत्या डिसेंबर मध्ये लग्न करणार आहे असेही बोलले जात आहे.

विकीच्य आधी अंकिता बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपुतला डेट करत होती. अनेक वर्ष दोघे लिव्हइनमध्ये राहिले होते. 2016 पर्यंत दोघांनी एकमेकांना डेट केल्यानंतर पुढे दोघेही वेगळे झाले. तिला यातू बाहेर पडणे खूपच कठिण गेले होते. परंतु हळूहळू मात्र ती यातून बाहेर पडली आणि तिचे मन विकीमध्ये गुंतत गेली. शिवाय ते दोघेही लग्न करणार आहेत असेही समजत आहे.

काही दिवसांपूर्वी अंकिताचा एक व्हिडीओ समोर आला होता. त्यात ती खुलेआम विकीला किस करताना दिसत होती. हा व्हिडीओ सोशलवर प्रचंड व्हायरल झाला होता.