TV अभिनेत्री चाहत खन्नानं सांगितला फ्लाईटमधील ‘भयानक’ अनुभव !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – टीव्ही अ‍ॅक्ट्रेस चाहत खन्ना हिनं नुकताच तिला आलेला फ्लाईट अपघाताचा भयानक अनुभव सांगितला आहे. तिच्यासोबत त्या दिवशी दोन घटना झाल्या. त्यापैकी एका घटनेत तिच्यासोबत विमान अपघातात होता होता राहिला. रनवे वरील ही घटना होती.

अलीकडेच चाहत एका इवेंटसाठी दिल्लीला आली होती. यानंतर तिला सकाळी 6 वाजता दिल्लीहून मुंबईला परत जाण्यासाठी फ्लाईट होती. एका रिपोर्टानुसार, चाहतनं एका मुलाखतीत सांगितलं की, अचानक प्लेनमध्ये जोरात ब्रेक लागल्यानं सारे ऑक्सिजन मास्क निघाले होते. सर्वजण घाबरले. नंतर थोडा प्रयत्न करून विमान हॉल्टमध्ये आणण्यात आलं आणि सर्व प्रवासी दुसऱ्या फ्लाईटमध्ये शिफ्ट करण्यात आले.

चाहतनं तिच्यासोबत घडलेल्या आणखी एका घटनेबद्दल सांगितलं आहे. चाहत म्हणाली, एअरपोर्ट जाताना ती ज्या कॅबमध्ये बसली होती त्याचा ड्रायव्हर तिच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी तिला बाहेर येण्यासाठी सांगत होता. चाहत म्हणाली, “मी पहाटे 4 वाजता माझ्या मित्राला कॉल करण्याचा प्रयत्न केला. मी ड्रायव्हरला सांगितलं की, पोलीस येत आहेत. पोलिसांचं नाव घेताच त्यानं मला एअरपोर्टला सोडलं. त्यानंतर रनवेवर विमानाची ब्रेकवाली घटना झाली. मला असं वाटलं की, मला जीव गमवावा लागतो की काय. घरी आल्यानंतर मी सुटकेचा निश्वास टाकला.”

View this post on Instagram

Its Time to write a new story ……

A post shared by CK (@chahattkhanna) on

 

You might also like