‘क्राईम पेट्रोल’ फेम अभिनेत्री प्रेक्षा मेहताची गळफास घेऊन आत्महत्या ! ‘हे’ होतं शेवटचं WhatsApp Status

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   एंटटेनमेंट इंडस्ट्रीतून गेल्या काही दिवसांपासून अनेक वाईट बातम्या समोर येताना दिसत आहेत. अशात आता पुन्हा एक बातमी समोर आली आहे. क्राईम पेट्रोल फेम अभिनेत्री प्रेक्षा मेहता हिनं इंदोरमधील घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेनं प्रेक्षाच्या कुटुंबियांसह सर्वांनाच धक्का बसला आहे. अद्याप तिच्या आत्महत्येमागचे कारणही समजू शकलेले नाही. प्रेक्षाच्या शेवटच्या व्हॉट्स अॅप स्टेसस आणि सोशल मीडिया पोस्टची सध्या खूप चर्चा सुरू आहे.

View this post on Instagram

Happy World Theatre Day Everyone! 🎭❤️

A post shared by Preksha Mehta 🎭 (@iamprekshamehta) on

समोर आलेल्या माहितीनुसार, प्रेक्षा कोरोना व्हायरसच्या काळात घरी आली होती. तिच्या अचानक जाण्यानं कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तिच्या जाण्याचं कारण जरी समोर आलं नसलं तरी डिप्रेशनमुळं तिनं हे पाऊल उचललं आहे असं तिच्या कुटुंबियांचं म्हणणं आहे. विशेष बाब अशी की, आत्महत्या करण्यापूर्वी तिनं तिच्या इंस्टा स्टोरीवरून निराशाजनक पोस्ट शेअर केली होती. पोलीस आता या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

प्रेक्षानं तिच्या इंस्टा स्टोरीला जी निराशाजनक पोस्ट लिहिली होती त्यात तिनं असं म्हटलं होतं की, सर्वात वाईट असतं ते म्हणजे तुमची स्वप्न मरून जाणं. प्रेक्षानं तिच्या व्हॉट्स अॅप स्टेटसलाही शेवटी याच ओळी शेअर केल्या होत्या.

प्रेक्षा इंदोरमधील बजरंग नगरमधील तिच्या घरात रहात होती. सोमवारी रात्री तिनं गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. गेल्या काही दिवसांपासून ती तणावात होती असं तिच्या घरचे सांगतात. प्रेक्षाला जेव्हा तिचे बाबा सकाळी उठवायला गेले तेव्हा त्यांना तिचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत सापडला. त्यांनी लगेच तिला हॉस्पिटलला नेलं. परंतु तोपर्यंत खूप उशीर झाला होता.

प्रेक्षाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तिनं क्राईम पेट्रोल दस्तकच्या काही एपिसोडमध्ये काम केलं आहे. अभिजीत वाडकर, संतोष रेगे आणि नगेंद्र सिंह राठोड यांचा नाट्य ग्रुप ड्रामा फॅक्टरीनं प्रेक्षानं आपल्या थिएरटला सुरुवात केली होती. मंटो लिखित खोल दो हा तिचा पहिला प्ले होता. प्रेक्षानं सोनी टीव्ही आणि कलर्स सारख्या मोठ्या चॅनलवरील अनेक प्रोग्राममध्ये काम केलं आहे.

View this post on Instagram

Good Morning 🌹 #sunkissed💋

A post shared by Preksha Mehta 🎭 (@iamprekshamehta) on

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like