Birthday SPL : ब्रेकअप नंतर बॉयफ्रेंडला परत मिळवण्यासाठी दिव्यांका त्रिपाठीनं घेतला होता ‘अंधश्रद्धे’चा आधार ! नंतर झालं ‘असं’ काही

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – TV ॲक्ट्रेस दिव्यांका त्रिपाठी (Divyanka Tripathi) आपल्या प्रोफेशनल लाईफ सोबत खासगी लाईफमुळंही सोशलवर आणि चाहत्यांमध्ये कायमच चर्चेत असते. आज (सोमवार दि 14 डिसेंबर 2020) दिव्यांका तिचा वाढदिवस साजरा करत आहे. आज आपण तिच्या लाईफबद्दल काही खास गोष्टी जाणून घेणार आहोत.

दिव्यांकानं टीव्ही ॲक्टर विवेक दहिया सोबत (Vivek Dahiya) 7 फेरे घेतले आहेत. लग्नाआधी तिच्या एका ॲक्टर सोबतच्या लव अफेअरचीही खूप चर्चा होताना दिसली होती.

दिव्यांका अभिनेता शरद मल्होत्रा (Sharad Malhotra) सोबत रिलेशनमध्ये होती. या अफेअरची सर्वत्र चर्चा होत असे. खुद्द दिव्यांकानंच सांगितलं होतं की, त्यांच रिलेशन 8 वर्षे होतं. परंतु एका पॉईंटरवर जाऊन दोघं वेगळे झाले.

या ब्रेकअपचा दिव्यांकावर खोलवर परिणाम झाला होता. एका चॅट शोमध्ये दिव्यांकानं सांगितलं होतं की, मी शरदला पुन्हा मिळवण्यासाठी प्रत्येक गोष्ट ट्राय केली होती. मी अंधश्रद्धेच्या पातळीवर गेले होते. एक वेळ अशी आली जेव्हा मला वाटायला लागलं की, एखाद्याचं प्रेम मिळवण्यासाठी एवढं सगळं करावं लागत असेल तर काय हे प्रेम आहे ? सर्व काही बंद केलं. नंतर जाणीव झाली की, नकोच.

दिव्यांका आणि शरद यांच्या नात्याबद्दल बोलायचं झालं तर 2004 साली आलेल्या झी सिने स्टार्स की खोज च्या सेटवर शरद आणि तिची ओळख झाली होती. बनू मैं तेरी दुल्हन मालिकेत त्यांनी एकत्र काम केलं होतं. 8 वर्षे नात्यात राहिल्यानंतर दोघं वेगळे झाले.

दिव्यांका आणि विवेक दहिया यांच्या लव स्टोरीबद्दल बोलायचं झालं एकता कपूरची मालिका तर ये है मोहब्बते च्या सेटवर दोघांचं प्रेम जमलं होतं. काही दिवस एकमेकांना डेट केल्यानंतर 2016 मध्ये त्यांनी लग्न केलं. आता दोघंही खूप खुश आहेत. दोघं सध्या त्यांची मॅरिड लाईफ एन्जॉय करत आहेत. सोशल मीडियावर त्यांचे फोटो आणि व्हिडीओ सतत चर्चेत असल्याचं दिसत असतं.

https://www.instagram.com/p/CGJtD1DsqSl/

दिव्यांकाच्या वर्कफ्रंटबद्दल बोालयचं झालं तर जेव्हा टीव्हीवर रामायणचा रिमेक बनवण्यात आला होता तेव्ही दिव्यांका त्रिपाठी हिला निवडण्यात आलं होतं. 2012 मध्ये ही मालिका प्रसारीत झाली होती. तिनं ये हैं मोहब्बतें मालिकेत डॉ. इशिताचा रोल केला होता. यातून तिनं आपली ओळख तयार केली होती. यातून तिला खूप लोकप्रियता मिळाली आहे.