Coronavirus Unlock 1 : अभिनेत्री एरिका फर्नांडिस म्हणते ‘No Risk’, केलं ‘सूचक’ विधान

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सध्या देशात पाचवा लॉकडाऊन म्हणजेच अनलॉक 1 सुरू आहे. अशात महाराष्ट्र सरकारनं काही नियमांसोबत टीव्ही आणि फिल्मच्या शुटींगसाठी परवानगी दिली आहे. काहीजणांनी मुंबईची वाट धरली तर काही कलाकार असेही आहेत जे अजूनही सेटवर जाण्यासाठी डगमगत आहे. यापैकीच एक कसौटी जिंदगी की फेम एरिका फर्नांडिस आहे. सध्या तरी तिनं सेटवर जाण्यासाठी नकार दिला आहे.

एका मुलाखतीत बोलताना एरिका म्हणाली, “हा फक्त हो किंवा नाही असा प्रश्न नाहीये तर यासोबत खूप काही जोडलेलं आहे. लोक दीर्घकाळापासून काम न करता रहात आहेत. काही लोकांकडे तर वापस जाण्याशिवाय दुसरा कोणता पर्याय नाही. मला विचाराल तर मी यासाठी तयार नाही. किमान आता तरी नाहीच. शक्य आहे की, मी या वर्षाच्या अखेरीपर्यंत वापसी करेन.”

यामागील कारण सांगताना एरिका म्हणते, “लॉकडाऊनमध्ये ढील मिळाल्यानंतर आता संक्रमितांचा आलेखही चढण्याची पूर्ण शक्यता आहे. मान्सूनही सुरू होणार आहे. अशात अनेक लोक आजारी पडतील. सामान्य फ्लू, डेंग्यू, मलेरियाची लक्षणंही या व्हायरससोबत मिळती जुळती आहेत. यामुळंच लोकांमध्ये दहशत पसरली आहे.”

एरिका पुढे म्हणते, “सेटवर सर्व क्रू मेंबर्स मास्क आणि ग्लब्सचा वापर करतील परंतु अॅक्टर्सला याच्याशिवाय शुटींग करावी लागेल. अशात त्यांच्यासाठीचा धोका आणखी वाढेल.”

एरिकाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर, सध्या ती लोकप्रिय टीव्ही शो कसौटी जिंदगी की 2 मध्ये दिसत आहे. यात ती प्रेरणाची भूमिका साकारत आहे. यात तिची जोडी पार्थ समथानसोबत आहे. यातील दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना खूप आवडली आहे. याआधी एरिका कुछ रंग प्यार के ऐसे भी या मालिकेत दिसली होती. यात तिच्यासोबत शाहीर शेख लिड रोलमध्ये होता. दोघांच्या अफेअरच्या खूप चर्चा होताना दिसल्या.