‘स्वतः संसदेत बसून फोनवर पॉर्न पाहता अन् आम्हाला रामायण पहावयास सांगताय’ ! TV अभिनेत्री कविता कौशिकचं वादग्रस्त ट्विट

पोलीसनामा ऑनलाइन – ’स्वत: संसदेत बसून मोबाईलवर पॉर्न पाहातात आणि आम्हाला रामायण बघण्यास सांगतात’, असं ट्वीट टीव्ही मालिका अभिनेत्री कविता कौशिक यांनी केले आहे. दुरदर्शनवर पुनर्प्रक्षेपित करण्यात येत असलेल्या जुन्या ’रामायण’ मालिकेवर त्यांनी सवाल उपस्थित केला आहे. एवढेच नाही तर तिने देशातील राजकीय नेत्याबाबत वादग्रस्त टिप्पणीही केली आहे. मात्र, कविताच्या ट्वीट इतर यूजर्सनी नाराजी व्यक्त करत तिची जोरदार खिल्ली उडवली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या मागणीमुळे शासनाने ’रामायण’चे दुरदर्शनवरून पुनर्प्रक्षेपण केले आहे. यामुळे प्रेक्षक आनंद व्यक्त करत असताना टीव्ही अ‍ॅक्ट्रेस कविता कौशिकने ट्वीट करुन रामायणाच्या पुनर्प्रक्षेपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत वादग्रस्त वक्तव्यही केले आहे. मात्र, यूजर्सने कविताच्या या ट्वीटवरुन तिला ट्रोल केले आहे.

काय म्हणाली कविता कौशिक?
’स्वत: संसदेत बसून मोबाईलवर पॉर्न पाहातात आणि आम्हाला रामायण बघण्यास सांगतात’, असं ट्वीट कविताने केले आहे. तिच्या या ट्वीटवर इतर यूजर्सने तिला ट्रोल केले आहे. एक यूजरने कृपया पोलिसांनी कविताला तत्काळ अटक करावी. तिने रामायणाची तुलना पॉर्नशी केली आहे. आता सहन करणार नाही. आता मुद्दा धर्माचा आहे असे म्हटले आहे. ’मोबाईलवर तर तू काहीही पाहू शकते. रामायण तर टीव्हीवर दाखवले जात आहे. कविता कौशिक हिनेही ट्रोलर्सवर पलटवार केला आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी पतीसोबत घेतलेल्या एक सेल्फीवरून कविता कौशिक चर्चेत आली होती. कविताने एक सेल्फी ट्वीट केला होता. त्यात कविताचा पती भांडे धुताना दिसत होता. त्यावरुन युजर्सनी तिला ट्रोल केलं होते.नागरिकांच्या मागणीमुळे दूरदर्शनवर शनिवारपासून रामायण, महाभारत, व्योमकेश बक्षी आणि सर्कस या मालिका पुन्हा प्रसारित करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानंतर आता झी मराठीनेही आपली लोकप्रिय मालिका स्वराज्यरक्षक संभाजी पुन्हा एकदा प्रसारित करण्याचा निर्णय घेतला आहे.

You might also like