Video : मुंबईतील पावसात अडकली ‘ही’ अभिनेत्री ; ‘या’ अभिनेत्याने केली वेळीच मदत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – एकीकडे देशातील काही भागात लोक पावसाची वाट पहात आहेत. तर दुसरीकडे काही ठिकाणी इतका पाऊस होत आहे की, लोकांचे हाल सुरु आहेत. मुंबईबद्दल बोलायचे झाले तर, बरेच लोक पासवामुळे अडचणीत आहेत. सामान्य काय आणि खास काय सर्वांचेचे हाल सुरु आहेत. अमिताभ बच्चन यांच्याही घराबाहेर पाणी जमा झालं आहे. अशातच आता टीव्ही अ‍ॅक्ट्रेस क्रिस्टल डिसूजाने आपल्या अडचणीबद्दल सांगितले आहे.

सध्या क्रिस्टलचा एक व्हिडीओ सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओत दिसत आहे की, क्रिस्टल बोलत आहे की, ती पावसात अडकली होती परंतु करण पटेलने तिला योग्य वेळी मदत केली. करण तिथे पोहोचला आणि त्याने तिला आपल्या घरी नेले.

यावेळी तिची गाडीही खराब झाली होती. क्रिस्टलने करणच्या घरी आल्यावर व्हिडीओ बनवला होता. या व्हिडीओत क्रिस्टल म्हणते की, जिथे क्रिस्टल अडकली होती ती जागा करणच्या घराच्या जवळच होती. तिने मदतीसाठी करणला बोलावलं आणि करण लगेचच धावत तिथे आला.

मुंबईमध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. बिग बी अमिताभ बच्चनच्या घराबाहेर इतकं पाणी जमा झालं आहे की, हे पाणी घरात शिरत आहे. त्यामुळे तिथे सावधगिरी बाळगत खास काळजी घेतली जाताना दिसत आहे की हे जास्त होऊन परिस्थिती बिघडायला नको. घराबाहेर पाणी जमा झाल्याने घरात येण्या-जाण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.

ज्या भागात अमिताभ बच्चन राहतात त्या भागातच फिल्म इंडस्ट्रीतील अनेक मोठ्या लोकांची घरे आहेत. अक्षय कुमार, ऋतिक रोशन, दिवंगत अभिनेता शशी कपूरचे घरही याच भागात आहे. पृथ्वीराज कपूर यांनी निर्मिती केलेलं प्रसिद्ध पृथ्वी थिएटर देखील याच रोडच्या जवळ आहे.