प्रेमात धोका झाल्याने अभिनेत्रीची आत्महत्या

हैदराबाद : वृत्तसंस्था – टीव्ही मालिकांमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्रीने प्रेमात धोका झाल्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक माहीती समोर आली आहे. याप्रकरणी हैद्राबाद पोलिसांनी प्रियकराला अटक केली आहे. तेलगु अभिनेत्री एस. नागा झांसी (वय-२१) असे आत्महत्या केलेल्या अभिनेत्रीचे नाव असून तिने ५ फेब्रुवारी रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तिचा प्रियकर सूर्या तेजाला अटक करण्यात आली आहे.

नागा झांसी आणि सूर्य तेजा यांच्यामध्ये मैत्री होती. मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. मात्र काही दिवसांनी सूर्य तेजा हा तिला त्रास देऊ लागला. त्याच्या त्रासाला कंटाळून तीने आत्महत्या केली. आपल्या प्रियकराने प्रेमात धोका दिल्याने आलेल्या नैराश्येतून तिने आत्महत्येचा मार्ग स्विकारला असल्याची माहिती हैद्राबाद पोलिसांनी दिली.

टीव्ही सीरीयल पवित्र बंधन या मालिकेत एस. नागा हिने काम केले आहे. पंजागुट्टाचे सहाय्यक पोलीस आयुक्त विजय कुमार म्हणाले, नागा झांसीला तिच्या प्रियकरानं आत्महत्या करण्यास भाग पाडल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला. त्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरूनच सूर्या तेजाला अटक करण्यात आली आहे.