‘घटस्फोट’ झाल्यानंतर आता Bigg Boss १३ मध्ये दिसणार अभिनेत्री रिध्दि डोगरा !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – टीव्हीचा सगळ्यात प्रसिद्ध टीव्ही शो ‘बिग बॉस १३’ लवकरच सुरु होणार आहे. शो ची तयारी जोरदार सुरु आहे. ‘बिग बॉस सीजन १३’ च्या घोषणेनंतर शोच्या स्पर्धकांमध्ये टीव्ही-बॉलिवूडच्या सेलिब्रिटींची नावे समोर आली आहे. आता या शोमध्ये अभिनेत्री रिद्धी डोगराच्या नावाची चर्चा सुरु आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, बिग बॉस मेकर्सने टीव्हीवरील अभिनेत्री रिद्धी डोगराला शोचा हिस्सा बनण्यासाठी अप्रोच केले होते. माहितीमध्ये असा ही दावा केला आहे की, रिद्धी ‘बिग बॉस १३’ च्या घरामध्ये एन्ट्री करण्यासाठी तयार आहे. तिने शोचे कॉन्ट्रॅक्ट साईन केले आहे. काही दिवसांपुर्वी रिद्धी डोगराचे पति राकेश बापट या दोघांच्या घटस्फोटाची चर्चा खूप पसरली होती. रिद्धी आणि राकेश यांच्या लग्नाला ७ वर्ष झाल्यानंतर यांचा घटस्फोट झाला.

‘बिग बॉस १३’ मधील स्पर्धकांबद्दल बोलायचे म्हणले तर, एका वृत्तपत्राने अशा कलाकारांच्या नावांचा खुलासा केला आहे की, ज्यांना या शो मध्ये अप्रोच केले आहे आणि जे शोचा हिस्सा बनण्यासाठी तयार आहे. यामध्ये सीआईडी फेम दयानंद शेट्टी, कॉमेडियन अभिनेता राजपाल यादव, टीवी अभिनेत्री मेघना मलिक, देवोलीना भट्टाचार्य आदी कलाकारांची नावे सामील आहे.

‘बिग बॉस १३’ च्या स्पर्धकांच्या लिस्टमध्ये बॉलिवूडमधून बाहेर पडणारी अभिनेत्री जायरा वसीमच्या देखील नावाची चर्चा आहे. या वर्षी हा शो सप्टेंबर महिन्यात सुरु होणार आहे.

सलमान खानने याआधीच सांगितले आहे की, तो हा शो होस्ट करणार आहे. त्याने शो होस्टिंगबद्दल बोलताना म्हणाला की, अनमोल आणि कलर्स चॅनेल अनेक लोकांना घेऊन येतात आणि त्यांना बिग बॉसमध्ये सहभागी करतात. मला त्यांच्यासोबत डिल करावे लागते. मी कधी होस्टिंग एन्जॉय करत असतो तर कधी एन्जॉय करत नाही.

 

आरोग्यविषयक वृत्त –
लहान मुलांच्या खाण्यापिण्याच्या वेळेची ‘अशी’ घ्या काळजी

आंब्याची पानेही आरोग्यासाठी आहेत ‘फायदेशीर’

पावसाळ्यात खा भरपूर ‘जीवनसत्व’ असलेला आरोग्यदायी ‘राजमा’

स्तनाचा कॅन्सर, डायबेटीजचा धोका कमी करण्यासाठी ‘हे’ सेवन करा

रोग प्रतिकारशक्तीवर परिणामकारक ठरतात ‘या’ गोष्टी

दररोज ४ काजू, ८ मनुका सेवन करा, झटपट बरे होतील ‘हे’ आजार

‘हृदया’च्या आरोग्यासाठी दररोज न्याहारी घेतलीच पाहिजे

‘या’ कारणामुळे येत पुरुषांमध्ये वंध्यत्व